उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल  बुधवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये नवी मुंबईतून मुलांनी बाजी मारली आहे. एकूण निकालांपैकी मुलांची संख्या अधिक असून नवी मुंबईचा निकाल ८७.५७ टक्के इतका लागला आहे.

५७ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी फादर अ‍ॅगल ज्यु कॉलेज वाशी, व सेंट झेव्हिअर्स नेरुळ या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आल्यांनतर शहरातील सायबर कॅफे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आवारात मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी विद्याथ्यांर्नी गर्दी केली होती.

बारावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईतील एकूण १३,४९४ विद्यार्थी बसले होते. त्यात ७,३४२ मुले तर ६१५२ मुलींचा समावेश होता. परीक्षेला बसलेल्या १३,४९४ विद्यार्थ्यांपैकी ११८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात मुलांची संख्या अधिक असून ६ हजार १९२ मुले उत्तीर्ण झाले आहे, तर ५६२५ मुली उत्तीर्ण झाल्या आहे.

उरणचा निकाल ८४ टक्के

उरण : उरण तालुक्याचा १२ वीचा निकाल ८४.२१ टक्के लागला असून मार्च २०१६ च्या परीक्षेसाठी उरणमधून एकूण १ हजार ९१० मुले बसली होती. त्यापैकी १ हजार ७०९ विद्यार्थी या परीक्षेत उर्तीर्ण झाले आहेत. एकूण ११ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी शहरातील रोटरी कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातील ६९ पैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १२ वीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे.