पनवेल : नवी मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणारे शांतिलाल कोळी यांचा रविवारी डी. वाय. पाटील रुग्णालयात करोना उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आतापर्यंत करोना संसर्गाने नवी मुंबई पोलीस दलातील नऊ जणांचा बळी गेला आहे.कोळी हे ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कोळी हे सीबीडी बेलापूर येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. सध्या ते एनआरआय पोलीस ठाण्यात कार्यरत होते. १५ सप्टेंबरपासून त्यांना करोनाची लक्षण दिसू लागल्याने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते.  नवी मुंबई पोलीस दलातील ९५० जणांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला आहे.

अंमलबजावणी कठीण

नवी मुंबई पोलीस दलात ५५ वर्षांवरील पोलिसांची संख्या मोठी आहे. नव्या आदेशानुसार घरून काम केल्यास अनेक पोलीस ठाण्याचा कारभाराची खांदेपालट करावा लागेल. पोलीस सहआयमुक्तांसह आयुक्तांना यापुढे घरातूनच काम करावे लागेल.