23 October 2020

News Flash

पोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित

नऊ जणांचा मृत्यू; कमी मनुष्यबळात काम

नऊ जणांचा मृत्यू; कमी मनुष्यबळात काम

पनवेल : साडेतीन हजार मनुष्यबळावर नवी मुंबई, पनवेल व उरणच्या काही परिसराची सुरक्षा पाहणारे नवी मुंबई पोलीसही करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आतापर्यंत ९३३ पोलीस कर्मचारी, अधिकारी करोनाबाधित झाले असून त्यातील नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे यातील ८३४ जण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण पाहता प्रत्येक पोलीस ठाण्यातील ३० ते ३५ जण बाधित आहेत. अशा परिस्थितीतही कमी मनुष्यबळात ते काम करीत आहेत.

९३३ करोनाबाधित पोलिसांमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४१ ते ५५ या वयोगटातील आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ५१ ते ५५ वयोगटातील चार व  ४१ ते ५० या वयोगटातील चौघांचा समावेश आहे.

बाधितांमध्ये ८१३ पोलीस कर्मचारी तर १११ पोलीस अधिकारी आहेत. यामध्ये ३१ ते ४० या वयोगटातील ३१९ पोलीस कर्मचारी व ४६ पोलीस अधिकारी बाधित आहेत. ५६ ते ६० वयोगटातील २०५ कर्मचारी व ३५ अधिकारी बाधित झाले आहेत. मात्र त्यापैकी कोणाचाही मृत्यू उपचारादरम्यान झाला नाही.   सध्या ९९ पोलीस करोनाबाधित आहेत. रस्त्यावर नागरिकांशी वारंवार येणाऱ्या संपर्कामुळे बाधितांचे प्रमाण वाढत असल्याचे वेलनेस पथकातील अधिकारी सांगत आहेत.

तरुणांमध्ये प्रमाण कमी

तरुणांची प्रतिकारशक्ती अधिक चांगली असल्याने २० ते ३० वयोगटातील पोलिसांचे बाधितांमध्ये कमी प्रमाण आहे. आतापर्यंत ११७ जण या वयोगटातील पोलीस करोनाबाधित असून एकही जणाचा मृत्यू झाला नाही. तर विशेष म्हणजे ५६ ते ६०या वयोगटातील २०५ जणांना संसर्ग झाला असून यातील एकही जणाचा मृत्यू नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 2:09 am

Web Title: 933 members of police force affected with coronavirus zws 70
Next Stories
1 नेरुळमध्ये १७०० खाटांचे काळजी केंद्र
2 टाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ
3 निर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’
Just Now!
X