सिडको आणि महापालिकेचे घणसोली विभाग कार्यालय यांनी शुक्रवारी रबाळे गोठिवली परिसरातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली. या वेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रबाळे गावानजीक स्थानिक रहिवासी राजू धोत्रे यांनी विकासकाला इमारत बांधण्यासाठी जागा दिली होती, परंतु विकासकाने सिडकोची परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम केले. यामध्ये इमरतीचे तीन मजले बांधण्यात आले असतानाच कारवाई करण्यात आली होती. या इमारतीतील घरांची खरेदी-विक्री करू नये, असा फलकही लावण्यात आला होता, परंतु विकासकाने मनमानी करत वरील मजल्यांचे काम सुरूच ठेवले, अशी माहिती सिडकोचे अधिकारी गणेश झिने यांनी दिली.

रबाळेतील गोठिवली परिसरातील अनधिकृत चायनिजचे दुकान आणि एक आरसीसी प्लिंथ तोडण्यात आला. पोलीस बंदोबस्त, एक जेसीबी, ४० मजूर आणि २ ट्रकच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.