14 July 2020

News Flash

दहा हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

नवी मुंबई वाहतूक शाखेच्या वतीने दहा हजार २०९ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई वाहतूक शाखेच्या वतीने दहा हजार २०९ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नऊ लाख ९९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्ग, पामबीच रोड आणि शहरातील मुख्य अंतर्गत रस्ते आणि चौक येथे हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. १३ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या विशेष मोहिमेत १० हजार २०९ दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असून टप्प्याटप्याने शहराच्या सर्वच भागामध्ये तीव्र करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपआयुक्त अरिवद साळवे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2016 12:09 am

Web Title: action against people who driving without helmet
Next Stories
1 साहित्य माणसाला जगायला शिकवते
2 रिक्षात महिलेचे मंगळसूत्र खेचले
3 द्रोणागिरी नोडमधील भूखंडाच्या दराची कोटीकडे वाटचाल
Just Now!
X