21 October 2018

News Flash

११२ बेवारस वाहनांवर कारवाई

पालिकेच्या आवाहनानंतर वाहनमालकांनी दुर्लक्ष केल्याने पालिकेची मोहीम

रस्त्यावर अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या ११२ बेवारस वाहनांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

पालिकेच्या आवाहनानंतर वाहनमालकांनी दुर्लक्ष केल्याने पालिकेची मोहीम

रस्त्यावर अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या ११२ बेवारस वाहनांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिसरातील अनेक रस्त्यांवर बराच काळ बंद पडलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. शिवाय वाहनांखालील कचरा साफ करता येत नसल्याने स्वच्छतेला बाधा पोहोचते. त्यामुळे अशा वाहनमालकांनी आपापली वाहने उभ्या असलेल्या जागांवरून हटवावेत, असे अनेकदा महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

अद्यापही अनेक ठिकाणी अशा प्रकारची बेवारस, नादुरुस्त व अपघातग्रस्त वाहने अनेक ठिकाणी आढळून येतात. पालिकेतर्फे वाहने हटविण्याबाबत वाहनमालकांना अंतिम आवाहन करण्यात आलेले होते. त्यास अनुसरून सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात वाहनांवर कायदेशीर नोटिसा चिटकवून वाहने हटविण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्याबाबत आता पालिकेने धडक मोहीम हाती घेत टोईंगद्वारे वाहने उचलण्याची कारवाई करण्यात केली. टोईंगद्वारे उचलण्यात आलेली वाहने महानगरपालिकेने रबाळे सेक्टर ६ तसेच कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमी शेजारील मोकळ्या जागेत ठेवली आहेत.

First Published on January 13, 2018 2:42 am

Web Title: action against unauthorized vehicles in navi mumbai