News Flash

करावेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी व ब्रेकरचा वापर करण्यात आला.

करावेजवळील सेक्टर ३६ मध्ये बांधकाम व्यावसायिक देवजी पटेल यांनी उभारलेल्या बेकायदा बांधकावर गुरुवारी सिडकोने कारवाई केली. १७१ चौ.मीटरवर उभारण्यात आलेल्या इमारतीचे खांब तोडण्यात आले. याच परिसरात ज्ञानदीप शाळेच्या बाजूला अरुण म्हात्रे व बांधकाम व्यावसायिक शेटे यांनी उभारलेले तळमजला व पहिल्या मजल्याचे कामही जमीनदोस्त करण्यात आले.

या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी व ब्रेकरचा वापर करण्यात आला. सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख एस. एस. पाटील, नियंत्रक दीपक हरवंडे, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी पी. बी. रजपूत, साहाय्यक नियंत्रण अधिकारी गणेश झिने यांच्या नियंत्रणात ही कारवाई करण्यात आली. एनआरआय पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एनआरआय पोलीस ठाण्यामार्फत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

करावे गावानजीक सेक्टर ३६ येथील दोन बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून यापुढे शहरातील बेकायदा बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे साहाय्यक अतिक्रमण नियंत्रण अधिकारी गणेश झिने यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:10 am

Web Title: action on unauthorized constructions 2
Next Stories
1 धर्माधिकारी कलासंकुलात चोरी
2 ‘ऐरोली-काटई उन्नत’ मार्गी
3 ऐन उकाडय़ात वीज ‘कोसळली’!