महापे एमआयडीसीतील ‘वैशाली लॉज’वर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांनी कारवाई केली. या वेळी चार तरुणींची सुटका करण्यात आली. तर तीन जणांना अटक करण्यात आली.
शहरातील लॉजमध्ये चाललेल्या अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी तातडीने कारवाई हाती घेण्याच्या सूचना नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे क्षेत्रातील महापे एमआयडीसी येथे ‘वैशाली लॉज’चा व्यवस्थापक ग्राहकांना तरुणी पुरवीत असल्याबाबत पोलीस निरीक्षक बी. व्ही. खटावकर यांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार सोमवारी ग्राहक असल्याचे भासवून लॉजमध्ये प्रवेश केला. त्या वेळी लॉजच्या व्यवस्थापकाने तरुणी पुरवीत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी व्यवस्थापक मिथुन गोपाळ पुजारी, दिवाकर शेट्टी, रुसीराम शर्मा यांना अटक केली. या वेळी चार तरुणींची सुटका करण्यात आली.