23 November 2017

News Flash

पनवेल परिसरात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

दोन किलोमीटपर्यंत वाहनांच्या व कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या होत्या.

प्रतिनिधी, पनवेल | Updated: May 20, 2017 12:54 AM

संग्रहित छायाचित्र

आदित्य ठाकरे यांच्या प्रचारफेरीत तरुणांची गर्दी

शिसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी पनवेल, खारघरमध्ये मुख्य रस्त्यांवरून चारचाकी वाहनातून प्रचारफेरी काढली. या फेरीला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दृश्य होते. दोन किलोमीटपर्यंत वाहनांच्या व कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या होत्या.

पनवेल शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदित्य ठाकरे यांनी प्रचारफेरीला  प्रारंभ केला. वाहनांचा ताफा नवीन पनवेल, खांदेश्वर वसाहतीमार्गे कामोठे व कळंबोली येथील वसाहतीमधून खारघर वसाहतीत पोहोचला आणि तिथेच फेरी समाप्त करण्यात आली. आदित्य ठाकरेंसोबत या फेरीमध्ये  एकनाथ शिंदे व शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर सहभागी झाले.

सुमारे  दोन किलोमीटर लांबीची ही फेरी पाहण्यासाठी व ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. वाहतूक पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

First Published on May 20, 2017 12:48 am

Web Title: aditya thackeray road show for panvel municipal election 2017