News Flash

‘राज’ पुत्र जखमी मनसैनिकाच्या भेटीला, भाजपा नगरसेवकाने केली होती मारहाण

भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी २९ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

पनवेलमधील कामोठे येथे भाजपा नगरसेवकाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांची शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी भेट घेतली. अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जाधव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. मनसे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही त्यांनी जाधव यांना सांगितले.

पनवेल महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी २९ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा कार्यकर्त्यांसोबत स्वतः नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सोसायटीतील अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागा मुळे भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधववर जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी सकाळी अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन प्रशांत यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 5:35 pm

Web Title: amit thackeray meet party worker injured in attack by bjp corporator in panvel
Next Stories
1 रेल्वे रुळांखालून जलवाहिन्या
2 ‘१२०० सीसी टीव्हीं’च्या प्रस्ताव मंजुरीकडे दुर्लक्ष
3 नवी मुंबई पालिका यंदा एक लाख झाडे लावणार
Just Now!
X