News Flash

महावितरणच्या कार्यालयात खळ्ळ्खटय़ाक

ऐरोली सेक्टर-१५ मधील महावितरणच्या कार्यालयात सोमवारी संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.

ऐरोलीतील प्रकार
ऐरोली सेक्टर-१५ मधील महावितरणच्या कार्यालयात सोमवारी संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. अनेक दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयात अधिकारी भेटत नसल्याने त्याचबरोबर वाढीव बिलाबांबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी कार्यालयातील खुच्र्या, संगणक, टेबल यांची तोडफोड केली.
ऐरोली परिसरातील नागरिकांना सध्या भरमसाट बिले महावितरणकडून पाठवली जातात. असेच एका महिलेला २० हजार रुपयांचे विद्युत बिल आले होते. तर इतर नागरिकांनीदेखील वाढीव बिले पाठवण्यात आली होती. यासाठी मागील पाच दिवसांपासून नागरिक महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. अनेकदा अधिकांऱ्याकडून संतापजनक उत्तर देण्यात आली होती. सकाळच्या सुमारास बिलाबाबत विचारणा करण्यात गेलेल्या काही नागरिकांना अधिकारी उपस्थित नसल्याने त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात आपला संताप व्यक्त केला. अधिकारी एस. जाधव यांच्या टेबल व इतर साहित्यांची तोडफोड केली. तर साहाय्यक अभियंत्याच्या संगणकाची व केबिनचीदेखील तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर सदरचे नागरिक पसार झाले. तत्पूर्वी घटनेनंतर नगरसेवक मनोज हळदणकर यांनी महावितरणच्या अधिकांऱ्याची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करीत महावितरणला आपला कारभार सुधारण्यासाठी सूचना केल्या. महावितरणच्या उपअभियंता महाजन यांनी रबाळे पोलीस ठाण्यात  याविषयी तक्रार दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 7:17 am

Web Title: angry residents vandalized msedcl office
टॅग : Msedcl
Next Stories
1 अपघातांनंतरही मार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्रशासन उदासीन
2 खांदेश्वर पोलीस ठाणे अतिरिक्त भूखंडाच्या प्रतीक्षेत
3 दहीहंडी उत्सव मंडळांचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
Just Now!
X