एपीएमसी प्रशासनाकडून उपाययोजना 

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : राज्य शासनाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सतर्कतेच्या उपायोजना केल्या आहेत. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज हजारोंच्या संख्येत नागरिकांची, वाहनांची वर्दळ असते. एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने खरेदीदाराला जीवनावश्यक वस्तूंची खरेदी  फोनवरून करण्याची सूचना केली आहे. तसेच प्रवेशद्वारावर तपासणीकरिता गन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वाशी बाजारात रोज परराज्यांसह परदेशी माल विक्रीकरता दाखल होत असतो. तसेच या बाजारात मुंबईसह इतर उपनगरातील खरीददार  जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी येत असतो. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ३३ वर पोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालय, नाटय़गृह  आणि चित्रपटगृह हे गर्दी होत असलेले ठिकाण अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

परंतु वाशीतील एपीएमसी बाजारात जीवनावश्यक वस्तू येत असतात . त्यामुळे हा बाजार पूर्णपणे बंद ठेवणे हे उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून सतर्कतेचा पाऊल उचलण्यास सुरुवात करण्यात येत आहे. वाशी बाजारात फळे, भाजीपाला , कांदा बटाटा या जीवनावश्यक वस्तू नित्याने दाखल होत असतात. त्यामुळे  बाजारात हजारोंच्या संख्येने गाडय़ांची वर्दळ तसेच नागरिकांचीही तितक्याच संख्येने रेलचेल असते.  त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्यासाठी  एपीएमसी प्रशासन व व्यापाऱ्यांनी खरेदीदारांसाठी ‘माल ऑन फोन’अशी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

बाजाराच्या प्रवेशद्वारावर गन मशीन ठेवण्यात येणार

विमानतळावर बाहेरून येणारम्य़ा प्रवाशांची तपासणी करण्यासाठी गन मशीन ठेवण्यात आले आहेत. या मशीनच्या आधारे प्रवाशांची तपासणी करून संशयित आढळल्यास त्यांना पुढील उपचार घेण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जाते . त्याच पद्धतीने एपीएमसी प्रशासनाने देखील बाजाराच्या प्रवेशद्वारावर गण मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एपीएमसी बाजारात दररोज मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते . त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रवेशद्वारावर सॅनिटाइजर ठेवण्यात आले असून लवकरच कर्मचारम्य़ांना मास्क किटचे वाटप करण्यात येणार आहे.

संत्र्यांना मोठी मागणी

संत्र्यांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याच्या माहितीवरून वाशी बाजारात संत्र्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या आंब्यांचा हंगाम सुरू आहे. याशिवाय बाजारात संत्रीही येत आहेत. संत्र्यांमध्ये ‘क’ जीवनसत्व असल्याच्या माहितीवरून अनेक जण नागरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संत्री खाण्याला पसंती देत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. एपीएमसी घाऊकबाजारात ४० ते ५०  गाडय़ा दाखल होत आहेत.  आठ डझनाला ६०० ते १२०० रुपये दर आहे. घाऊक बाजारात दर १०० रुपयांनी वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी संत्री किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६०ते ७० रुपयांना उपलब्ध आहे.

एपीएमसीत स्वच्छतेवर भर

* वाशी बाजारात (एपीएमसी) रोज फळे, भाजीपाला कांदा-बटाटा हा नाशवंत शेतमाल येत असतो. यातून निघणारा खराब माल बाजारातील आवारात फेकला जातो. त्यामुळे या बाजारात नेहमीच अस्वच्छता दिसते. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने बाजाराची स्वच्छता  करण्याचाही निर्णय घेतला आहे. फळ भाजीपाला बाजारात दर गुरुवारी व रविवारी ३१ मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर  र्निजतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच व्यापाऱ्यांनी गाळ्यातील कर्मचाऱ्यांना स्वच्छता राखण्यासाठी आवाहन करावे आणि त्यांना जंतुनाशके उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याची माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली आहे.

*  दरम्यान भाजीपाला आणि फळ बाजार ३१ मार्चपर्यंत बुधवारी रात्री ११ वाजल्यापासून गुरुवार रात्री ११ पर्यंत  तसेच शनिवार रात्री ११ पासून रविवार रात्री ११पर्यंत या  दोन दिवशी बंद ठेवण्यात येईल.

एपीएमसी बाजारातील नित्याने होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यापारम्य़ांना खरेदीदार यांना फोनवर माहिती देऊन  खरेदी केलेल्या मालाची दुकानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आली आहे . तसेच प्रवेशद्वारावर बाहेरून येणारम्य़ा नागरिकांची तपासणी करता गन मशीन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे आणि लवकरच कर्मचारम्य़ांना मास्क किटचे देण्यात येणार आहे.

अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी, वाशी