नवी मुंबई : घाऊक बाजारात आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात प्रचंड वाढ होत असताना शुक्रवारी घाऊक बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत दरात घट झाली आहे. ४० ते ४५ रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा २५ ते ३० रुपयांवर खाली उतरला आहे.

वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या महाराष्ट्राबरोबर गुजरात येथील कांदादेखील दाखल होत आहे. मात्र गुजरातमधील कांदा महाराष्ट्रावर वरचढ होऊ  नये म्हणून नाशिक बाजार समितीत कांद्याचे दर कमी केले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. तसेच पुन्हा टाळेबंदी होईल या भीतीनेही उत्पादन विक्रीला काढले आहे. मार्चमध्ये जुना कांदा काढणी करून बाजारात दाखल होईल. या भीतीपोटी जादा कांदा बाजारात दाखल होत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. घाऊक बाजारात ऑगस्ट अखेरपासून कांद्याच्या दरात सातत्याने

वाढ होत होती. परिणामी बाजारभाव तेजीत होते. आता घाऊक बाजारातील कांद्याच्या दरात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची घट झाली आहे.