25 September 2020

News Flash

अवकाळी पावसाचा फळांना फटका

ऑगस्टपासून सिमला, हिमाचल प्रदेश, कुलू-मनाली येथून सफरचंद बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते.

(संग्रहित छायाचित्र)

सफरचंद, सीताफळ, डाळिंबाची आवक ४० टक्क्यांनी घटली

वाशी बाजारात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत देशी सफरचंद, डािळब आणि सीताफळ मोठय़ा प्रमाणात दाखल होण्यास आरंभ होतो. मात्र असमाधानकारक पावसाची नोंद झाल्यानंतर अवकाळीचाही फळांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्क्यांनी घट झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ऑगस्टपासून सिमला, हिमाचल प्रदेश, कुलू-मनाली येथून सफरचंद बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. तशी सुरुवातही झाली होती, परंतु आठवडाभरापासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी झाल्याने सफरचंदची आवक खूप कमी झाली आहे. मुसळधार पावसामुळे तेथील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाशी बाजारात फळांची आवक वेळेत होऊ शकलेली नाही. गेल्या वर्षी ७० ते ८० गाडय़ा बाजारात दाखल झाल्या होत्या. यंदा गाडय़ांचे प्रमाण १० ते २५ इतके आहे.

घाऊक बाजारात हिमाचल प्रदेशातील सफरचंदला २५ ते ३० किलोला १८०० रुपये ते २२०० रुपये, तर काश्मीरमधील ७०० रुपये ते एक हजार रुपये बाजारभाव आहे. या सफरचंदाला उठाव नसल्याने दर स्थिरावल्याची माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली. पुणे, संगमनेर, सासवड आणि नगर येथून दाखल होणाऱ्या सीताफळाला यंदाच्या वर्षी कमी पावसाचा फटका बसला आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात येथील पूर्व भागात कमी पाऊस, तर पश्चिम भागात जास्त पाऊस झाला होता. बागायती क्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे.

सध्या बाजारात सीताफळाच्या दहा गाडय़ा दाखल झाल्या आहेत. फळे अद्याप पक्व न झाल्याने त्यांची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे आकाराने लहान आणि चवीला कमी गोड असलेले सीताफळ बाजारात दाखल होत आहे. गेल्या वर्षी याच हंगामात एकूण २० ते ३० गाडय़ा झाल्या होत्या. घाऊक बाजारात सीताफळ प्रतिकिलो ३० ते १५० रुपयांना विकले जात आहे. डाळिंबाची तीच अवस्था आहे. सोलापूर, नगर, नाशिक आणि पुणे येथून डाळिंबाच्या १५ ते २० गाडय़ा दाखल होत आहेत, मागील वर्षी ३०ते ४० गाडय़ा आवक झाली होती. डाळिंबाला प्रतिकिलो ४० ते १३० रुपये भाव आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने डाळिंब आणि सीताफळाची आवक घटली आहे, तर जम्मू-काश्मीरमधील सफरचंदांची आवकही कमी झाली आहे.

-संजय पिंपळे, घाऊक फळ व्यापारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 3:54 am

Web Title: apple pomegranate declined by 40 percent
Next Stories
1 गावठाण सर्वेक्षण मुद्दा ऐरणीवर
2 १५ मुलींवर अत्याचार करणारा अटकेत
3 हवामान बदलाचा ‘ताप’
Just Now!
X