News Flash

बनावट उत्पादनाची विक्री करणाऱ्यास अटक

२६ लाख ४४ हजार ६८७ किमतीच्या बनावट वस्तू व कच्चा माल जप्त केला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

नवी मुंबई : अधिकृत कंपन्यांचे लेबल चिटकवून बनावट उत्पादनाची विक्री करणाऱ्या एका आरोपीस तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २६ लाख ४४ हजार ६८७ किमतीच्या बनावट वस्तू व कच्चा माल जप्त केला आहे.

विनोद हिरजी डूबरिया असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी विनोद हा अंधेरी एमआयडीसी भागात राहतो. गामी इंडस्ट्रियल पार्क भूखंड क्रमांक सी ३९ येथील गाळा क्रमाक ६४ पावणे एमआयडीसी येथे ‘गोदरेज हिंदुस्थान, युनिलिव्हर डाबर इडिया, आयसी सोल्युशन डायव्हरसी व इतर विविध कंपनीच्या उत्पादन वस्तू व मालाचे  बनावट उत्पादने विकत होता. याबाबत तुर्भे एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर छापा मारून २६ लाख ४४ हार ६८७चा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:10 am

Web Title: arrested for selling counterfeit products akp 94
Next Stories
1 मॅट्रिमोनिअल साईटवरुन १२ उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढून लैंगिक शोषण; भामट्याला मुंबईत अटक
2 पनवेलमधील दुकाने चार वाजेपर्यंतच खुली
3 ग्राहकांच्या प्रतीक्षेत दुकान मालक
Just Now!
X