News Flash

कुटुंबसंकुल : निरोगी वातावरणातील रहिवासी

सीवूड सेक्टर-४४ येथे २००६ साली नीलम रेसिडेन्सीची निर्मिती झाली.

 

नीलम रेसिडेंसी को.ऑप. हाऊसिंग सोसायटी, सीवूड्स

स्वच्छता अभियानाची काटेकोर अंमलबजावणी सीवूड्स येथील ‘नीलम रेसिडेन्सी को-ऑप हौसिंग सोसायटी’ येथे केली जात आहे; मात्र अजून एक वैशिष्टय़ म्हणजे या ठिकाणी विविध प्रकारच्या औषधफवारणी करून या ठिकाणी असलेल्या रहिवाशांसाठी निरोगी वातावरण ठेवण्यासाठी येथील गृहनिर्माण संस्था सदैव तत्पर असते. त्यामुळे या सोसायटीचा आदर्श इतर वसाहती घेत आहेत.

सीवूड सेक्टर-४४ येथे २००६ साली नीलम रेसिडेन्सीची निर्मिती झाली. या ठिकाणी एकूण १५ कुटुंबांना आरोग्यदायी वातावरणाचा लाभ मिळत आहे. वेळोवेळी स्वच्छता आणि आणि औषधफवारणी केली जात आहे.

या संकुलात सुरवातीलाच आरोग्यावर विशेष भर दिला जात आहे. संस्थेचे सदस्य स्वत: या ठिकाणी जातीने लक्ष घालतात. परिसरात नियमित औषध फवारण्या, स्वच्छता राखण्याची विशेष काळजी घेतात. संकुलातील पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करून, तसेच या वसाहतीत स्वच्छ पाणीही साचणार नाही, याची विशेष दाखल व जनजागृती या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना करून दिली जाते .जास्त करून पाण्याच्या माध्यमातून रोग पसरतात त्यामुळे आम्ही पाण्याविषयी अधिक काळजी घेत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. त्यामुळेच या ठिकाणी असलेल्या रहिवासीयांचे आरोग्य वर्षांनुवर्षे ताजेतवाने आहे.

संकुल लहान असल्याने या जागेत उत्तमोत्तम सुविधा राबवल्या जात आहेत. यात पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी १५ ते २० दुचाकी व ८ ते १० चार चाकी वाहनांची पार्किंग सोय आहे.

या ठिकाणी कुटुंब संस्कृतीचा जास्त अनुभव अनुभवायला मिळत आहे. येथील कुटुंब माणुसकीच्या श्रीमंतीवर अधिक खुलून दिसत आहे. त्यामुळे या वसाहतीच्या सुंदरतेप्रमाणे येथील राहणाऱ्या रहिवाशांचे मनही तितकेच सुंदर आणि ताजेतवाने आहे. एकाच छताखाली राहणारे येथील कुटुंब आणि माणुसकीचा धर्म याचा सुंदर मिलाप वर्षांनुवर्षे साधत असल्याने त्या ठिकाणची प्रसन्नता शब्दांत मोजता येत नाही. त्यामुळे छोटी वसाहत सुंदर वसाहत व छोटे संकुल सुखी संकुल अशी ओळख या वसाहतीची बनलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2017 1:02 am

Web Title: article on neelam residency seawoods
Next Stories
1 उद्योगविश्व : रंगाच्या दुनियेतील मराठी पाऊल
2 उजाड डोंगरांवर वनीकरण
3 पनवेल महापालिकेतर्फे वाहनतळ उभारणी
Just Now!
X