09 March 2021

News Flash

इमारतीच्या गेटवर कार पार्किंगबद्दल विचारला जाब; तरुणाने रहिवाशांना दाखवला बंदुकीचा धाक

सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी केला तपास सुरु

कोपरखैरणे : किरकोळ वादावरुन एका तरुणाने येथील एका सोसायटीत येऊन रहिवाशांना बंदुकीचा धाक दाखवला.

सोसायटीच्या गेटवर गाडी पार्क का केली? असा जाब विचारल्याप्रकरणी एका तरुणाने आपल्या मित्रासोबत येऊन सोसायटीतील रहिवाशांना बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना कोपरखैरणे येथे रविवारी रात्री घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोपरखैरणे सेक्टर २३ मध्ये एक तरुण आपली चारचाकी पार्क निघून गेला होता त्याची कार गेटवरच पार्क केल्याने सोसायटीच्या रहिवाशांना आपल्या गाड्या आतबाहेर काढणे शक्य होत नव्हते म्हणून तेथील एका रहिवाशाने कार पार्क करणाऱ्या तरुणाला परतल्यावर जाब विचारला, यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तरुण तिथून कारसह निघून गेला.

मात्र, रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा एका मित्राला घेऊन दुचाकीवर घेऊन आला आणि हातातील पिस्तूल रहिवाशांसमोर रोखून त्यांना धमकावले. अशा प्रकारे खुलेआम एका तरुणाने बंदुकीचा धाक दाखवल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद न करता केवळ तक्रार अर्ज दाखल करुन घेतला आहे. तपास केल्यावर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत जगदाळे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 1:08 pm

Web Title: asked about car parking at the gate of the building the youth showed fear of guns to the residents aau 85
Next Stories
1 नवी मुंबईत करोनाबधितांची संख्या १६ हजारांच्या पार
2 नवी मुंबईत ३४२ नवे करोनाबाधित; एकूण संख्या पोहोचली १५,७२७ वर
3 नवी मुंबईत ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची घोषणा
Just Now!
X