News Flash

कोपरखैरणेतील पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी १४ जणांना अटक

हल्ला पूर्वनियोजित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्याचा कसून तपास करण्यात येत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कोपरखैरणे येथील सिडकोच्या भूखंडावरील अनधिकृत झोपडय़ांवर मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पोलीस आणि सिडको कर्मचाऱ्यांवर हिंसक जमावाने दगडफेक केल्याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ला पूर्वनियोजित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्याचा कसून तपास करण्यात येत आहे.

जयश्री काळे, रुपत पवार, गंगू काळे, रकमा काळे, तेजू शिंदे, सुमन काळे, लक्ष्मी पवार, शिल्पा साठे, अनिता काळे, गंगू पवार, गोविंद पवार, विठ्ठल काळे, चंद्रशेखर आझाद, प्रमोद दुबे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे.

कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बेकायदा झोपडपट्टीवर मंगळवारी सिडकोच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असताना झोपडपट्टीतील रहिवाशांनी त्यांच्यावर दगडफेक केली, त्यात कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी अवटी, पोलीस निरीक्षक सुनील गवळी, उपनिरीक्षक के.चव्हाण, पोलीस नाईक रमाकांत देसले, पोलीस शिपाई रघुनाथ शिंदे, सुहास घाडगे आणि पोलीस उपनिरीक्षक अरुणा जाधव हे जखमी झाले होते. यापैकी शिवाजी अवटी यांना गंभीर दुखापत झाली होती.

हल्ला पूर्वनियोजित?

पोलिसांवर झालेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसावर दगडफेक एखादा जमाव करतो मात्र या ठिकाणी दगड असणे शक्य नसताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दगड आले कुठून, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे. ज्या बाटल्या फेकून मारल्या त्यातही पाणी आणि तिखट टाकण्यात आले होते. त्यामुळे अचानक कारवाई सुरू झाली आणि लगेच हल्ला केला, असे होणे शक्य नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हा मियाभाईकोण?

यातील बहुतेक झोपडय़ा भाडे तत्त्वावर देण्यात आल्या होत्या. कोणाला भाडे दिले जाते, याबाबत रहिवाशांनी मौन बाळगले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्भेतील मियाभाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचाच यामागे हात असल्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 1:20 am

Web Title: attack on police in koparkhairane14 people arrested illegal encroachment
Next Stories
1 २ दिवसांत २०० झोपडय़ा
2 अतिक्रमण करून शिरजोरी
3 महापे भुयारी मार्गाची पहिल्याच पावसात दैना
Just Now!
X