नवी मुंबई : आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका वाहन व्यवसायाला बसला आहे. नवी मुंबईतही वाहन खरेदी मोठय़ा प्रमाणात घटली आहे. आर्थिक वर्षांचा विचार करता २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये एकूण वाहन खरेदी नोंदणीत तीन हजार ७६२ वाहनांची घट  झाली आहे. यात सर्वाधिक घट रिक्षा प्रवासी वाहनात झालेली आहे.

नवी मुंबईच्या १४ लाख लोकसंख्येच्या तुलनेत निम्मी अर्थात सात लाख वाहनांची संख्या आहे.

दरवर्षी अंदाजे १२ ते १४ हजार दुचाकींची विक्री होते. या संख्येत यंदा घट झाली आहे. चारचाकी खरेदीत  २०१९मध्ये केवळ टॅक्सी प्रवासी वाहनांची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे, मात्र अन्य वाहनांच्या खरेदीत घट  झाली आहे.

आमच्याकडेही यंदा गाडय़ांच्या विक्रीत फार वाढ झालेली नाही. छोटय़ा गाडय़ांचीच थोडीफार विक्री झाली आहे. मात्र एकंदरीत हे वर्ष फार खडतर जात आहे.

-मुकुंद सोनी, जुने वाहन विक्रेते 

नवी मुंबईत प्रथमच वाहन नोंदणी संख्येत घट  आढळून आली आहे. याला नेमके  कारण स्पष्ट होत नसले तरी वाढलेली महागाई, तसेच सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता हे एक कारण असू शकते.

-दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

१५६. ७२ कोटी रुपये उत्पन्न २०१८ साली कर रुपाने शासनाला मिळाले.

१३९ कोटी रुपये उत्पन्न २०१९ साली कर रुपाने शासनाला मिळाले.

वाहननामा           २०१८           २०१९

दुचाकी                  १२,०००       १०, ६९६

कार                      ४,८६१         ४, ४७१

टॅक्सी                   १००           ७३३

मोठी वाहने            १७००          १५५०

रिक्षा                     ४,५००         २, ८५२

एकूण                  २४, ६९५        २०, ९३३