24 February 2021

News Flash

बीट चौकी उघडली, पण उद्घाटनापुरतीच

रहिवाशांच्या मागणीवरून कोपरखैरणे सेक्टर-२३ येथे आठ वर्षांपूर्वी बीट चौकीचे गाजावाजा करीत उद्घाटन करण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

कोपरखैरणेतील पोलीस मदत केंद्र आठ वर्षांपासून बंदच; गुन्हे वाढत असल्याने सुरू करण्याची मागणी

रहिवाशांच्या मागणीवरून कोपरखैरणे सेक्टर-२३ येथे आठ वर्षांपूर्वी बीट चौकीचे गाजावाजा करीत उद्घाटन करण्यात आले. चौकी उघडली, पण फक्त त्या उद्घाटनापुरतीच. आजपर्यंत तक्रारदारांना तिची प्रतीक्षाच आहे.

कोपरखैरणे सेक्टर २३ चा मोठा भाग हा खाडीकिनारी येतो. या ठिकाणी सिडकोकालीन अनेक इमारती जशा आहेत तसेच खासगी गगनचुंबी इमारतीही आहेत. खास करून याच सेक्टरमध्ये माताबाल रुग्णालय, गुरुद्वारा आणि सर्वात आकर्षण असलेले निसर्ग उद्यान आहे. सध्या माताबाल रुग्णालय बंद आहे. निसर्ग उद्यान असल्याने या ठिकाणी हजारो नागरिक सकाळी चालण्यासाठी येत असतात. त्यामुळे रस्त्यावर पादचाऱ्यांची गर्दी जास्त होत असते. नेमकी हीच संधी साधून साखळीचोरीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय परिसरात घरफोडी, वाहनचोरीही वाढली आहे. गुन्ह्य़ांचे वाढते प्रमाण पाहता रहिवाशांनी येथे बीट चौकीची मागणी केली होती. त्या परिसरापासून जवळची बीट चौकी तीनटाकी येथे आहे.

मात्र, अनेकदा आपल्याच सीमेतील तक्रारी बीट चौकीत घेतल्या जात असल्याने थेट पोलीस ठाणे गाठावे लागत होते. त्यामुळे बीट चौकीची गरज ओळखून माताबाल रुग्णालयसमोरच्या जागेत ही बीट चौकी उभी राहिली. उद्घाटनही करण्यात आले. मात्र एकही दिवस चौकी पुन्हा उघडण्यात आलीच नाही, असा दावा परिसरातील अनेकांनी केला. त्यामुळे पोलिसांनी हा फार्स कशासाठी केला, असाही प्रश्न रहिवासी विचारात आहेत. सध्या ही बीट चौकी बंद असून डीमार्ट चौकीत कामकाज होते. या चौकीत फारसे कोणी येत नाहीत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी सांगितले.

पोलीस ठाणे लांब पडते आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आलाच तर त्वरित घटनास्थळी पोहोचता यावे यासाठी बीट चौकी निर्माण करण्यात आली, मात्र सेक्टर २३ची बीट चौकी गरजेची असताना बंद आहे. आज त्या ठिकाणी बीट चौकीची खोली आहे, मात्र कामकाज चालत नाही. आम्हाला आता थेट पोलीस ठाण्यातच जावे लागते.

– शुभांगी ननावरे, रहिवासी, सेक्टर २३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 3:00 am

Web Title: beat outpost opened but only for the inauguration
Next Stories
1 कोकण भवन परिसरातील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर
2 करंजा बंदराची प्रतीक्षा संपणार
3 शहरबात : नियोजनाअभावी ‘टंचाई’
Just Now!
X