News Flash

अनिकेत तटकरेंना भाजपचा पाठिंबा?

भाजपचे प्रकाश बिनेदार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘ठाकूर व तटकरे यांची भेट झाली की नाही याची कल्पना नाही, गुप्त मतदान झाले आहे, त्यामुळे पाठिंबा आहे

सुनील तटकरे, प्रशांत ठाकूर यांची भेट

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशीच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी उघडपणे भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेलमध्ये भेट घेतल्याने भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून तटकरे यांचे पुत्र अनिकेत ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे राजीव साबळे उभे आहेत.

भाजप-शिवसेनेची राज्यात युती असताना विधान परिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या उमेदवाराच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपचे प्रकाश बिनेदार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘ठाकूर व तटकरे यांची भेट झाली की नाही याची कल्पना नाही, गुप्त मतदान झाले आहे, त्यामुळे पाठिंबा आहे की नाही, हे सांगणे कठीण आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 2:40 am

Web Title: bjp support to aniket tatkare
Next Stories
1 नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत
2 खारघरमधील पाणथळ गिळंकृत?
3 पावसाळ्यातील बेगमी ठरणारी सुकी मासळीही महाग
Just Now!
X