News Flash

उरणमध्ये ‘कमळा’चे स्वबळ

शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या उरण शहर परिवर्तन आघाडीला भोपळा मिळाला आहे.

नगर परिषदेत भाजप १८ पैकी १३ जागांवर विजयी; सेना, महाआघाडीचा पराभव

उरण नगर परिषदेसाठी मतदारांनी भाजपला कौल दिला असून १८ पैकी १३ जागा भाजपच्या पारडय़ात टाकत एकहाती सत्ता दिली. शिवसेनेला ५ जागांवरच समाधान मानावे लागले, तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सायली म्हात्रे यांनी शिवसेनेच्या अर्चना शिंदे यांना १ हजार ६०० पेक्षा अधिक मतांनी पराजित केले आहे. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या उरण शहर परिवर्तन आघाडीला भोपळा मिळाला आहे. उरणमध्ये गेली १५ वर्षे भाजप व शिवसेनेची सत्ता होती, मात्र या निवडणुकीत त्यांच्यात युती न झाल्याने या दोन्ही पक्षांनी स्वबळ अजमावले.

उरण नगर परिषदेवर प्रथमच भाजपने स्वबळावर आपली सत्ता आणली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विजयानंतर जोरदार घोषणा दिल्या आणि फटाके फोडले. विजयी मिरवणुकांनी शहर परिसर दणाणून गेला.  निकाल  कळताच शहरासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उरणमध्ये दाखल झाले. कोटनाका येथून  मिरवणूक काढण्यात आली.

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अध्र्या तासात साडेदहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी भरत शितोळे यांनी प्रभाग ९ पासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. यात प्रभाग ९ मधील दोन्ही जागा जिंकत भाजपने विजयाची गुढी उभारली आणि शेवटही दोन जागा जिंकत भाजपने केला.

निवडून आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोटनाका, जरीमरी मंदिर, मोहल्ला, आनंद नगर, नगर परिषद कार्यालय, स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक अशी मिरवणूक काढली. उरण शहराच्या कानाकोपऱ्यांत फटाक्यांची आतषबाजी करून हा विजय साजरा करण्यात आला. विजयी उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जाऊन तेथील नागरिकांचे जाहीर आभार मानले. निवडणुकीत परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे नगराध्यक्ष महेश बालदी यांनी आभार मानले. जनतेसाठी केलेला उरण शहराच्या विकासाचा निर्धार पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी  दिली.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक १-अ

* विजयी : भाजपच्या रजनी सुनील कोळी (११६४)

* शिवसेनेच्या प्रवीणा चंद्रकांत कोळी (१०३५)

प्रभाग क्रमांक १-ब

* विजयी : भाजपचे जयेंद्र लक्ष्मण कोळी (१३०१) विजयी

* शिवसेनेचे नितीन घनश्याम कोळी (९७९)

प्रभाग क्रमांक २-अ

* विजयी : भाजपच्या आशा सदानंद शेलार (९०६)

* शिवसेनेचे मेघा मनोज मेस्त्री (८६५)

प्रभाग क्रमांक २-ब

* विजयी : भाजपचे नंदकुमार बाबाजी लांबे (९९७)

* शिवसेनेचे कैलास विनायक पाटील (९१८)

प्रभाग क्रमांक ३-अ

* विजयी : शिवसेनेच्या विद्या अमित म्हात्रे (७८६)

* भाजपच्या रोशनी सचिन थळी (६२८)

प्रभाग क्रमांक ३-ब

* विजयी : शिवसेनेचे गणेश भास्कर शिंदे (८१६)

* भाजपच्या रोहिदास हरिश्चंद्र गावंड (६६५)

प्रभाग क्रमांक ४-अ

* विजयी : शिवसेनेचे अतुल सुरेश ठाकूर (७९२)

* भाजपचे पराग दत्तात्रेय म्हात्रे (५७९)

प्रभाग क्रमांक ४-ब

* विजयी : शिवसेनेच्या वर्षां अरुण पाठारे (७५४)

* भाजपच्या सुषमा गजानन उभारे (६९९)

प्रभाग क्रमांक ५-अ

* विजयी : भाजपच्या गॅस यास्मिन मुहम्मद फाईक (८३९)

* काँग्रेसच्या अफशा मुज्जम्मील मुकरी (४४४)

प्रभाग क्रमांक ५-ब

* विजयी : शिवसेनेचे समीर उस्मान मुकरी (८८८)

*  भाजप नवीन देवीदास राजपाल (६६७)

प्रभाग क्रमांक ६-अ

* विजयी : भाजप स्नेहल भीमदास कासारे (८५९)

* शिवसेनेच्या अंकिता मंगेश कासारे (७३६)

प्रभाग क्रमांक ६-ब

* विजयी : भाजप रवि यशवंत भोईर (९६२)

* शिवसेनेचे मिलिंद भरत भोईर (६४०)

प्रभाग क्रमांक ७-अ

* विजयी : भाजप जान्हवी लोकेश पंडित (८६२)

*  शिवसेनेच्या धनश्री दिवाकर शिंदे (६४०)

प्रभाग क्रमांक ७-ब

* विजयी : भाजपचे मेराज रमजान शेख (७९७)

* शिवसेनेचे नीलेश गणपत भोईर (७३५)

प्रभाग क्रमांक ८-अ

* विजयी : भाजपचे धनंजय लक्ष्मण कडवे (६६५)

* शिवसेनेचे गणेश सदाशिव पाटील (६४३)

प्रभाग क्रमांक ८-ब

* विजयी : भाजपच्या प्रियांका जगदीश पाटील (७९३)

  • शिवसेनेच्या दीपाली प्रवीण मुकादम (५४७)

प्रभाग क्रमांक ९-अ

* विजयी : भाजपच्या दमयंती वैभव म्हात्रे (५३१)

* शिवसेनेच्या ममता भाईचंद्र पाटील (४१०)

प्रभाग क्रमांक ९-ब

* विजयी : भाजपचे राजेश मधुकर ठाकूर (४६५)

शिवसेनेचे भूषण महादेव घरत (४०४)

 

नगराध्यक्षपदी सायली म्हात्रे

* विजयी : भाजपच्या सायली सविन म्हात्रे (७४९२)

* शिवसेनेच्या अर्चना गणेश शिंदे (६०६५)

* महापरिवर्तन आघाडीच्या नाहिदा इरफान ठाकूर (२५४८)

* अपक्ष नंदा उल्हास माजगावकर (२००)

भाजपचा उमेदवार १ ४२७ मतांनी विजयी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 2:04 am

Web Title: bjp win uran municipal council
Next Stories
1 शहरबात उरण  : ‘विकासाचा महामार्ग’ खरंच पोहोचवा!
2 नागरी सुविधांचे १२ प्रस्ताव शासनाकडे
3 विकासाच्या मुद्दय़ावर भाजप विजयी
Just Now!
X