24 September 2020

News Flash

तोतया नौदल अधिकाऱ्याला अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी त्याच्यावर पाळत ठेवत त्याला अटक केली.

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई : नौदलात अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीस वाशी पोलिसांनी अटक केली आहे. स्वस्तात वस्तू घेऊन देतो सांगत लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. हा तोतया प्रत्यक्षात बारावी पास आहे.

मनीष अरिसेरा असे अटक आरोपीचे नाव आहे. तो शिरवणे गावात राहत आहे. नौदलात अधिकारी असल्याचे भासवत होता. गणवेश परिधान करूनही तो वावरत असे. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने त्याची छाप पडत होती. याचाच गैरफायदा घेत त्याने अनेकांना लॅपटॉप, मोबाइल यासह सोने-चांदीचे दागिने कमी किमतीत खरेदी करून देण्याचे आमिष दाखवले. आलेल्या तक्रारींनुसार ७ लाख ३२ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी त्याच्यावर पाळत ठेवत त्याला अटक केली. झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट ओळखपत्र, रक्षा मंत्रालयाचे बनावट ओळखपत्र, नौदलाचे बनावट नोकरी पत्र, तसेच इतर बनावट कागदपत्रे सापडली आहेत. आरोपीला २०१६ मध्येही एनआरआय पोलिसांनी अटक केली होती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:51 am

Web Title: bogus naval officer arrested for cheating zws 70
Next Stories
1 नवी मुंबईत करोना नियमांना हरताळ
2 जेएनपीटी बंदरात कांदा पडून
3  ‘बार’च्या जागी भाजी, तर फोटो स्टुडिओत मुखपट्टय़ांची विक्री
Just Now!
X