28 February 2021

News Flash

परिवहनच्या मालमत्तांचा वाणिज्य विकास

उत्पन्नवाढीसाठी ३८९ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प

संग्रहित छायाचित्र

उत्पन्नवाढीसाठी ३८९ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाबरोबर गुरुवारी नवी मुंबई परिवहन उपक्रमाचाही अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. पालिकेने या वर्षी ‘एनएमएमटी’ला अनुदानापोटी १५० कोटींचा निधी दिला आहे. मात्र यातून परिवहनचा तोटा भरून निघणारा नसल्याने परिवहनाच्या मालमत्तांचा विकास करीत त्याचा वाणिज्य वापरातून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. आरंभीच्या शिलकेसह ३७९ कोटी ४९ लाख २९ हजारांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून यातून ३८९ कोटी ४३ लाख ९४ हजार खर्च होणार असून ५ लाख ३५ हजार शिल्लक राहणार आहे.

दिवसेंदिवस इंधन खर्च वाढत असल्याने ‘एनएमएमटी’ला बससेवा देणे डोईजड होत आहे. करोनाकाळात टाळेबंदीमुळे बससेवा बंद होती, मात्र अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच करोना रुग्णांसाठी रुग्णवाहिना म्हणूनही बसचा वापर करण्यात आला होता. तसेच परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या मूळगावी परतण्यासाठी बससेवा देण्यात आली होती. या दरम्यानच्या कालावधीत परिवहनाला ६ ते ९ कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे इंधनावरील खर्च कमी करून प्रवाशांना पर्यावरणपूरक, प्रदूषणरहित आणि वातानुकूलित बससेवा देण्याचा संकल्प यात करण्यात आला आहे.

सन २०२०-२१ मध्ये केंद्राच्या ‘फेम एक ’ या योजनेअंतर्गत नवीन १०० विद्युत बसच्या खरेदीस मान्यता मिळाली असून त्या अंतर्गत मार्च २०२१ पासून ३० बसेस व ऑगस्ट २०२१ पर्यंत उवरित ७० बस प्रवासी सेवा देतील. याव्यतिरिक्त ५० विद्युत बस भविष्यात उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन ४० सीएनजी बस व ३० विद्युत बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक, प्रदूषणरहित, वातानुकूलित बस सेवा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे इंधन बचत होत परिवहन उपक्रमाचा तोटाही कमी होण्यास मदत होणार आहे. परिवहन उपक्रम स्वयंपूर्ण, स्वावलंबी होण्यासाठी वाशी सेक्टर ९ येथील बस स्थानकाच्या वाणिज्यिक विकासास सुरुवात झालेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यात आता इंधन दरवाढीमुळे  तोटय़ात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पर्यावरणपूरक, प्रदूषणरहित, विद्युत बससेवा देण्याचे ठरविले आहे. तसेच बाह्य़ उत्पन्न वाढविण्यासाठी बस आगारांचे वाणिज्यिक वापर करण्याची तरतूद करण्यात येत आहे.

-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, नवी मुंबई महापालिका परिवहन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 12:32 am

Web Title: budget of navi mumbai municipal transport also approved zws 70
Next Stories
1 करोनाकाळातही दमदार वसुली
2 आरोग्यसेवेला नवसंजीवनी
3 उन्नत रेल्वेसाठी सिडकोची जमीन
Just Now!
X