16 December 2017

News Flash

दोन अपघातांत एक ठार, एक जखमी

जेएनपीटी कामगार वसाहतीच्या दरम्यान नादुरुस्त झाल्याने एक घरगुती गॅस सिलेंडरचा ट्रक उभा होता.

प्रतिनिधी,उरण | Updated: January 9, 2016 2:47 AM

उरण-पनवेल मार्गावरील अपघातग्रस्त बस.

उरण तालुक्यातील दुर्घटना; संतप्त नागरिकांचा रास्तारोको
उरण तालुक्यात शुक्रवारी दोन अपघात घडले असून सकाळी सातच्या दरम्यान उरण पनवेल रस्त्यावर एनएमएमटी बसने गॅस सिलेंडरच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात एक वयस्क महिला गंभीर जखमी झाली आहे.तर आठ वाजताच्या सुमारास पूर्व विभागातील विंधणे गावाजवळ कंटेनर वाहनाने धडक दिल्याने डोक्यात हेल्मेट असतानाही चिरनेर गावातील २३ वर्षीय जितेंद्र काळण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
उरण-पनवेल रस्त्यावरील वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे व जेएनपीटी कामगार वसाहतीच्या दरम्यान नादुरुस्त झाल्याने एक घरगुती गॅस सिलेंडरचा ट्रक उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकला नवी मुंबईकडून येणाऱ्या भरधाव एनएमएमटीने जोरदार धडक दिल्याने बसमधील वयस्क महिलेच्या पायाला डोक्याला गंभीर जखम झाली असून तीच्यावर उपचार सुरू आहेत. गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडक दिल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने अशी घटना घडली नाही,त्यामुळे जीवित हानी झाली नाही.तर चिरनेर येथील तरुण मागील दहा दिवसांपूर्वीच एका खाजगी बँकेत नोकरीला लागला होता.तो आपल्या स्कुटीवरून नवी मुंबईत जात असताना विंधणे गावाजवळ एका कंटेनर वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यामुळे जड वाहनांना या मार्गावरून बंदी घालावी अशी मागणी करीत संतप्त जमावाने रस्ता रोको केला.

First Published on January 9, 2016 2:47 am

Web Title: bus accident in uran
टॅग Bus Accident