– विकास महाडिक

कॅल्शियम कार्बाईडची पूड वापरून फळे पिकवण्यावर राज्य सरकारने घातलेली बंदी आणि केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा प्राधिकरणाने इथिलिन फवारणीवर घेतलेला आक्षेप यामुळे व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंबे झटपट पिकवण्यासाठी एक नवीन शक्कल शोधून काढली आहे. इथिलिन गॅसची निर्मिती करणारी एक भुकटी भरलेली पुडी वापरून आंबे पिकवले जात आहेत. या कापडी पुडय़ा भिजवून आंब्याच्या पेटय़ांमध्ये ठेवल्या जातात. बाजारात याला चायना पुडी म्हणून ओळखले जाते.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

हापूस आंब्याच्या व्यापारात तीव्र स्पर्धा आहे. त्यात कोकणातील हापूस आंब्याला जगात मोठी मागणी असल्याने तो लवकरात लवकर बाजारात आणण्याची अहमहमिका बागायतदार आणि व्यापाऱ्यांमध्ये सुरू असते. बाजारात आलेला आंबा लवकर पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांनी विविध क्लृप्त्या शोधलेल्या आहेत. आंबे पिकवण्यासाठी गेली अनेक वर्षे वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. यावर सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली. त्यानंतर भारतात ही बंदी टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आली. याला पर्याय म्हणून इथिलिनचे गॅस किंवा फवारणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यालाही आता केंद्र सरकारच्या अन्न व सुरक्षा प्रधिकरणाने आक्षेप घेतला आहे. त्यात ३९ टक्के असलेले इथेफॉनच घातक ठरत असल्याचे निरीक्षण या प्राधिकरणाने नोंदविले आहे.

पर्याय म्हणून व्यापाऱ्यांनी चायना पुडी वापरण्यास सुरुवात केली आहे. इथिलिन गॅसचा अंतर्भाव असलेल्या या भुकटीच्या चार पुडय़ा दोन किंवा चार डझनाच्या हापूस आंब्यांच्या पेटीत चार कोपऱ्यांत ठेवल्यास हापूस आंबा पिकण्याची प्रक्रिया वेगाने होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या पुडीतील इथिलिन गॅसला राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाची परवनागी असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे थोडीशी पाण्यात भिजवून ही पुडी आंब्याच्या पेटीत ठेवण्याची पद्धत सध्या सर्रास वापरली जात आहे. एक हजार पुडय़ांच्या डब्यासाठी सात ते साडेसात हजार रुपये मोजावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हे उत्पादन चीनमधून येत असल्याने त्याला चायना पुडी म्हटले जात आहे.

कायद्यानुसार १०० पीपीपी इथिलिन वापरण्यास परवानगी आहे. या चायना पुडय़ा किती पीपीपीच्या आहेत, याची तपासणी केली जाईल. चायना पुडीच्या तक्रारी आलेल्या नाहीत. तपासणी केली जाईल. आरोग्याला घातक असलेल्या रसायनाला परवानगी दिली जाणार नाही.     – सुरेश देशमुख, साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध विभाग, ठाणे</strong>