30 May 2020

News Flash

जत्रांमुळे कोंबडी महागली

कोंबडय़ा पाळणारेच उदासीन राहिल्याने गावातील कोंबडय़ांची संख्या घटली आहे.

४०० ते ६०० रुपये किंमत

उरणसह सर्वत्र सध्या गावोगावच्या देवींच्या जत्रा आणि यात्रा सुरू असून या यात्रांमधील परंपरेनुसार अनेक ठिकाणी गावठी कोंबडी किंवा कोंबडा देवाला नैवेद्य म्हणून देण्याची प्रथा आहे. यासाठी गावठी कोंबडीला मागणी वाढली आहे; मात्र सध्या गावठी कोंबडय़ांची आवकच कमी आणि मागणी वाढल्याने सामान्यांच्या आवाक्यातून गावठी कोंबडी सुटली आहे. त्यामुळे कोंबडीची किंमत आता ४०० ते ६०० रुपयांवर पोहोचली आहे.

कोंबडय़ा पाळणारेच उदासीन राहिल्याने गावातील कोंबडय़ांची संख्या घटली आहे. ज्या ठिकाणी अजून शहरीकरणाचे वारे पसरलेले नाही अशा ठिकाणी, तसेच आदिवासी वाडय़ांवर कोंबडय़ा उपलब्ध आहेत; मात्र त्याचे प्रमाण कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने तिच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती कोंबडी विक्रेते जयराम पाटील यांनी दिली. तर जत्रेला वर्षांतून एकदा गावठी कोंबडीचा नैवेद्य देण्याची प्रथा असल्याने महाग झाली तरी कोंबडी खरेदी करीत असल्याचे मत कैलास ठाकूर यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2016 4:05 am

Web Title: chicken price hike due to the fairs
Next Stories
1 नेरुळमधील ‘डीपीएस’च्या शुल्कवाढीविरोधात मोर्चा
2 ‘एनएमएमटी’चे व्यवस्थापक आठ वर्षांपासून ‘बेघर’
3 ‘टँकरमुक्त उरण’ने आदिवासींचे पाणी पळवले
Just Now!
X