News Flash

नाताळच्या बाजारपेठेवर चिनी प्रभाव

सजावटीसाठी स्वस्त-मस्त चिनी साहित्यालाच ग्राहक पसंती देत आहेत.

ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजच्या प्रतिकृती, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी

नाताळ दोन आठवडय़ांवर आला असताना सांताक्लॉजच्या प्रतिकृती, टोप्या, ख्रिसमस ट्री आणि अन्य सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. दिवाळीत भारतीय आणि जपानी बनावटीच्या साहित्याला असलेली मागणी नाताळमध्ये मात्र रोडावली आहे. सजावटीसाठी स्वस्त-मस्त चिनी साहित्यालाच ग्राहक पसंती देत आहेत.

पूर्वी केवळ ख्रिस्ती बांधवांपुरताच मर्यादित असलेला हा सण आता घरोघरी साजरा केला जाऊ लागला आहे. त्यामुळे वर्षांगणिक नाताळच्या सजावटीची बाजारपेठ विस्तारू लागली आहे. मोठय़ा मॉलपासून गल्लीबोळांतील दुकाने, कार्यालये आणि घरोघरीही नाताळनिमित्त ख्रिसमस ट्री उभारणाऱ्यांची, सजावट करणाऱ्यांची आणि सांताच्या टोप्या घालून फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हे साहित्य खरेदी करणाऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.

नवी मुंबईतील दुकानांबाहेर उभे केलेले सांताक्लॉजचे पुतळे, मुखवटे छोटय़ा दोस्तांना आकर्षित करत आहेत. सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलले आहेत. ट्रीच्या सजावटीसाठीही विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. ख्रिसमस ट्री, लुकलुकणारे दिवे, चकाकणाऱ्या चांदण्या, झुंबरे, मेटॅलिक लँप, पोस्टर्स, स्नो मॅन, स्टिकर्स, बॅनर्स, बेल्स, एंजल्स, बॉल, लहान-मोठय़ा आकाराचे रंगीत बॉल्स, विविध आकारांतील रंगीत मेणबत्त्या, फुलांसाठीचे आकर्षक स्टँड, येशूच्या जन्मसोहळ्याचे आकर्षक देखावे, सांताक्लॉजच्या आकारातील खेळणी, सांताची टोपी, मास्क, ड्रेस, चॉकलेट, स्टार, ड्रम, चेरी, गिफ्ट्स अशा विविधरंगी आणि आकर्षक साहित्याने दुकाने भरून गेली आहेत. खराखुरा ख्रिसमस ट्री घरी, हॉटेलच्या आवारात, कार्यालयांच्या प्रवेशद्वारी ठेवून तो सजवणारेही आहेत.

लहान मुलांसाठी सांताक्लाजचे कपडे, टोप्या, दाढी, पोतडी खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. डेकोरेटिव्ह कँडलसेट, जेलीटेप, स्टँड विथ कँडल, सुवासिक कँडल, मदर मेरी, चॉकलेट्सचे डबे, खेळणी आकर्षक आवरणांत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. भारतीय बनावटीच्या साहित्यात थर्माकोलचे चेंडू आणि संताक्लॉजच्या प्रतिकृती एवढेच उपलब्ध आहे. ख्रिसमसनिमित्त मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करू इच्छिणारे पालक आगळ्या-वेगळ्या खेळण्यांच्या शोधात आहेत.

साहित्याच्या किमती

  • सांताक्लॉज मास्क – १५० रुपयांपासून
  • लहान ख्रिसमस ट्री- ३० ते ८०० रुपये
  • मोठा ख्रिसमस ट्री- २ ते ५ हजार रुपये
  • सजावट साहित्य- ५० रुपयांपासून

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 12:44 am

Web Title: chinese effect in indian christmas
Next Stories
1 उद्योगविश्व : ‘हिट एक्स्चेंजर’च्या क्षेत्रातील मक्तेदारी
2 कारवाईनंतर मॉलला उपरती
3 पार्किंग रोखण्यासाठी लोखंडी कुंपण
Just Now!
X