27 September 2020

News Flash

सिडकोची तळोजात दुसरी महागृहनिर्मिती

२३ हजार घरे; विकास आराखडय़ाच्या कामाला सुरुवात

(संग्रहित छायाचित्र)

२३ हजार घरे; विकास आराखडय़ाच्या कामाला सुरुवात

खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथील १५ हजार घरांच्या विक्रीला मिळालेला प्रतिसाद पाहता सिडकोने तळोजा येथे २३ हजार घरांच्या दुसऱ्या महानिर्मितीची तयारी सुरू केली आहे. मागील आठवडय़ात झालेल्या अधिकारी बैठकीत व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दुसऱ्या ऑनलाइन विक्रीच्या कामाची तयारी करण्याचे आदेश दिले आहे.

सिडकोच्या अभियंता विभागाने केलेल्या विकास आराखडय़ानुसार उपलब्ध भूखडांनुसार तळोजा येथे २५ हजार घरांऐवजी २३ हजार घरांची निर्मिती शक्य आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी या महागृहप्रकल्पातील ९ हजार घरे आरक्षित ठेवली जाणार आहेत. ही सर्व घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी राखीव राहणार आहेत.

सिडकोने नुकतीच १४ हजार ८३८ घरांची विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. या घरांसाठी १ लाख ९१ हजार मागणी अर्ज आले होते. त्यामुळे सिडकोच्या घरांना आजही चांगली मागणी असल्याचे दिसून आले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘मिशन हाऊसिंग’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. १५ हजार घरांच्या यशस्वी विक्रीनंतर आता दुसऱ्या महागृहनिर्मितीचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अभियंता व नियोजन विभागाला दिलेले आहेत. मागील आठवडय़ात या सर्व योजनेचा एक आढावा घेण्यात आला. त्यात तळोजा सेक्टर-३६ मध्येच या दुसऱ्या महागृहनिमितीसाठी एक १५ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध झालेला आहे. या ठिकाणी २३ हजार घरांची निर्मिती होणे शक्य आहे. ही सर्व घरे परवडणाऱ्या किमतीतील राहणार आहे. यातील ९ हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवली जाणार असून उर्वरित १४ हजार घरे ही अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी विकली जाणार आहेत. नुकत्याच विक्री करण्यात आलेल्या घरांसारखीच या घरांची ऑनलाइन विक्री केली जाणार असून २५ हजार व ५० हजार उत्पन्न क्षमता या घरांसाठी राहणार आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी अडीच वाढीव चटई निर्देशांक देण्यासंदर्भात आदेश आहेत. त्यामुळे या ठिकाणी जादा घरे तयार होण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यात ऑनलाइन अर्ज

या घरांच्या उभारणीसाठी उत्सुक असलेल्या विकासकांचा एक स्वारस्य विनंती अर्ज मागविण्यात येणार आहे. त्यातून विकासकाची निवड केली जाणार असून सिडकोने ही प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या नियोजन विभाग एक विकास आराखडा (ले-आऊट) तयार करीत आहे. हा आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. सिडकोने बांधकाम आणि विक्री एकाच वेळी सुरू करण्याची पद्धत राबविण्यास सुरुवात केली असल्याने पुढील महिन्यात किमान ऑनलाइन अर्ज विक्री होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांनी संबंधित सर्व विभागांनी या दुसऱ्या महागृहनिर्मितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

सिडकोच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागील आठवडय़ात या संदर्भात चर्चा होऊन एक ‘ले-आऊट’ तयार केला जात आहे. या योजनेत पंतप्रधान आवास योजनेतील घरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यासाठी अडीच एफएसआय मिळणार आहे. त्याचा डीपीआर बनविला जात असून तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब मिळाल्यावर या कामाला सुरुवात केली जाणार आहे.      -के. के. वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 12:56 am

Web Title: cidco development plan
Next Stories
1 पोलिसांचेच अनधिकृत पार्किंग?
2 प्रकल्पग्रस्तांची पंचाईत
3 बलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा
Just Now!
X