04 December 2020

News Flash

सिडको महागृहनिर्मितीतील घरांचा ताबा लांबणीवर; बँकाचे हप्ते मात्र सुरू

ताबा मिळेपर्यंत हप्ते थांबविण्याची सिडकोकडे मागणी; समाजमाध्यमांद्वारे ग्राहक एकवटले

(संग्रहित छायाचित्र)

लाभाथी दुहेरी आर्थिक संकटात; ताबा मिळेपर्यंत हप्ते थांबविण्याची सिडकोकडे मागणी; समाजमाध्यमांद्वारे ग्राहक एकवटले

दोन वर्षांपूर्वी काढलेल्या सोडतीतील ११ हजार घरांचा ताबा या महिन्यात देण्याचे आश्वासन सिडको करोना साथ रोगामुळे पाळू शकलेली नाही. मात्र या घरांचे सर्व हप्ते भरलेल्या हजारो ग्राहकांचे बॅंकांचे मासिक हप्ते मात्र सुरू झाले आहेत. घरही नाही आणि हप्ते सुरु अशा दुहेरी आर्थिक संकटात लाभार्थी ग्राहक अडकले आहेत. त्यामुळे घरांचा ताबा मिळेपर्यंत हप्ते थांबविण्यात यावेत अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

घणसोली, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे या घरांचे बांधकाम सुरू असून आता केवळ अंर्तगत कामे शिल्लक राहिली असल्याचे दिसून येते. करोना काळात अनेक कंत्राटदारांचे मजुर गावी गेल्याने ही कामे ठप्प झाली होती.

सिडकोने दोन लाख घरे बांधण्याच जाहीर केले आहे. त्यातील २४ हजार घरांचे बांधकाम सध्या महामुंबई क्षेत्रातील विविध नोड मध्ये सुरु आहे. सिडकोने दोन ऑक्टोबर रोजी १४ हजार ८३८ घरांची सोडत काढली होती. या घरांतील ११ हजार १७८  घरांचा ताबा देण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. या घरांचे तिमाही हप्ते भरण्यासाठी ग्राहकांना सहा हप्तांत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते. ११ हजारांमधील अनेक ग्राहकांनी घर लवकर मिळेल म्हणून हे हप्ते भरलेले आहेत. करोनाकाळात अनेक लाभार्थीचे रोजगार गेले आहेत तर काही जणांचे वेतन कपात झालेली आहे. त्यामुळे पाच व सहा हप्ते भरण्यास मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी ग्राहकांची होती. या काळात हप्ते न भरल्यास लागणारे विलंब शुल्क देखील माफ करण्यात यावे म्हणून ग्राहकांनी सरकारला साकडे घातले होते. त्यामुळे सिडकोने ग्राहकांचे विलंबशुल्क माफ केले आहे पण त्याची कोणतीही माहिती ग्राहकाला दिलेली नाही. ग्राहकांना भराव्या लागणाऱ्या शेवटच्या अतिरिक्त खर्चाच्या वेळी ही रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामुळेही  ग्राहक अस्वस्थ आहेत. विलंब शुल्क माफ केल्याचे जाहीर करुनही ते घेतले गेले आहे. सर्व हप्ते घेऊनही घरांचा ताबा न मिळाल्याने ही अस्वस्थता वाढली आहे. अनेक ग्राहकांचे हे पहिले घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याने आतापर्यंत ते भाडय़ाच्या घरात राहात आहेत. त्याचे नियमित भाडे द्यावे लागत असून बँकेने संपूर्ण कर्ज अदा केल्याने त्याचे हप्ते सुरू झाले आहेत. सप्टेंबपर्यंत मोरेटेईम काळ असल्याने आता बँकेचे नियमित हप्ते सुरू झाले असून पगार जमा होत असलेल्या बँकेतून ते वळते होत आहेत. आर्थिक संकटाचा सामान करावा लागत असल्याचे संतोष माने यांनी सांगितले.

करोना संकटामुळे हे बांधकाम ठप्प होती. मजुर कामगार गावी गेले होते त्यामुळे या घरांचा ताबा आता आणखी सहा महिन्याने मिळण्याची शक्यता आहे. मार्च पर्यंत ही घरे मिळतील असे सिडकोच्या वतीने स्पष्ट केले जात आहे. या पहिल्या टप्यातील घरामुळे डिसेंबर मध्ये घरांचा ताबा मिळणारी अडीच हजार घरे तर मार्च २०२१ मध्ये ताबा मिळणारी साडेअठाशे घरे आता पुढे सहा महिन्यांनी मिळणार हे स्पष्ट दिसून येत आहे. या काळातील बँकाने हप्ते व त्यावरील व्याज घेऊ नये यासाठी ग्राहकांची चळवळ सुरू झाली आहे.

भाडे द्यावे की हप्ते?

माझे हे पहिलेच घर असून सद्या भाडय़ाने राहतो. करोनाकाळात आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने हप्ते भरण्यास उशीर झाला. त्यामुळे सिडकोने विलंब शुल्कापोटी ९५ हजार रुपये अधिक घेतले. आता बॅंकेकडून कर्ज घेत हप्ते भरले आहेत. त्याचा पहिला हप्ताही गेला आहे. भाडे द्यावे की हप्ते भारावे असा प्रश्न आहे. त्यामुळे एकतर घराचा ताबा द्यावा नाहीतर हप्ते बंद करावेत, असे सिडको लाभार्थी संदीप बैलकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:16 am

Web Title: cidco extends possession of houses abn 97
Next Stories
1 पनवेलचे दुखणे कायम!
2 नवी मुंबई मेट्रोची पुढील कामे शासकीय कंपन्यांना?
3 ९२९ किलो चांदी जप्त
Just Now!
X