01 October 2020

News Flash

सिडकोच्या साडेतीन हजार घरांचे लवकरच वाटप

सिडकोच्या वतीने दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या महा गृहनिर्माण सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांची लवकरच वाटप प्रक्रिया राबवली जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र

टाळेबंदीतील नियमांचे पालन करण्यासाठी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांची ऑनलाइन सुनावणी घेणार

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : सिडकोच्या वतीने दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या महा गृहनिर्माण सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांची लवकरच वाटप प्रक्रिया राबवली जाणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली चार महिने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात सिडकोने लाभार्थी ग्राहकांच्या ऑनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेल्या आहेत. यासाठी आता ‘निवारा केंद्र’ या सोडतीनंतरच्या पोर्टलद्वारे ऑनलाइन सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाला सिडकोत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

महामुंबई क्षेत्रात सिडकोने दोन लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे. यासाठी जमिनीची शोध आणि आराखडे तयार करण्याचे काम प्रशासन पातळीवर सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी सिडकोने १४ हजार ७३८ घरांची सोडत काढली होती. या घरांचे बांधकाम शहरातील विविध भागात सुरू आहे. ही घरे मिळालेल्या भाग्यवंत ग्राहकांची कागदपत्र पडताळणी सुरू असतानाच मार्च महिन्यापासून देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या पणन विभागाने पहिले दोन महिने वाट पाहिल्यानंतर ऑनलाइन कागदपत्रे दाखल करणे, त्यांची छाननी, तक्रारी, सद्यस्थिती ही कामे सुरू करण्यात आली. त्यामुळे या काळात सिडको सहा हजार अर्जाची पडताळणी करू शकली. पुरेशी कागदपत्र सादर न करणाऱ्या ग्राहकांची घरे रद्द करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी सिडको त्या ग्राहकांची सुनावणी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली असली तरी नवी मुंबईत अद्याप टाळेबंदी कायम आहे. त्यामुळे सिडकोत सुनावणीसाठी येणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिडको या ग्राहकांची ऑनलाइन सुनावणी घेणार असून ग्राहकाकडून कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली जाणार आहे. यासाठी दूरचित्रसंवादाने त्या ग्राहकांशी संपर्क साधला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांशी संपर्क साधणाऱ्या अधिकाऱ्याची ओळख दिसू न देण्याची खबरदारी या दूरचित्रसंवादात घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक राहावी यासाठी सिडकोचे हे प्रयत्न आहेत.

१५ हजार घरांच्या कामाला वेग

सिडकोने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील काही ग्राहकांनी जूनअखेर पर्यत घरांचे हप्ते भरलेले आहेत. या टाळेबंदीत हे हप्ते भरू न शकणाऱ्या ग्राहकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सहा हजार ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणी झालेली आहे. यापैकी पूर्ण शुल्क भरलेल्या साडेतीन हजार ग्राहकांना लवकरच वाटपपत्र दिले जाणार आहे. सिडकोने या १५ हजार घरांच्या कामाला वेग दिला असून खारघर, तळोजा येथे काही घरे बांधून तयार आहेत. पूर्वे नियोजित कार्यक्रमानुसार सिडको ऑक्टोबर २०२० मध्ये यातील काही घरांचे ताबा देणार आहे. याशिवाय काही शिल्लक घरांची विक्रीदेखील केली जाणार आहे.

सिडकोने मोठय़ा प्रमाणात गृहनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही इमारतींची कामे सुरू असून काही घरे शेवटच्या टप्प्यात आहेत. ग्राहकांच्या ऑनलाइन सुनावणी घेतली जाणार असून प्रत्येक ग्राहकाला संधी दिली जाणार आहे. कादगपत्रे आणि शुल्क यांचे व्यवहार पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना लवकरच वाटप आणि ताबा देण्याचा सिडकोचा प्रयत्न राहणार आहे.

लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:04 am

Web Title: cidco home distribution will happen soon dd70
Next Stories
1 ६९५२ रुग्ण, लाभार्थी फक्त ६४
2 जुन्या आयुक्तांच्या संचिकांना नव्या आयुक्तांकडून चाप
3 वाशीतील निर्मनुष्य रस्त्यांवर माकडांच्या हुडदुडय़ा
Just Now!
X