लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : करोनामुळे एक वर्षे रखडलेल्या सिडकोच्या महागृहनिर्मिती प्रकल्पातील घरांचे बांधकाम मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिले आहेत. मार्चपर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यास एक मे रोजी या प्रकल्पातील भाग्यवंताच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

सिडको परिवहन आधारित गृहसंकुलांवर भर देणार असून ट्रक टर्मिनल, बस व रेल्वे स्थानकांजवळील मोकळ्या जागेत ही घरे बांधली जाणार आहे. या घरांना काही सामाजिक संस्थांचा विरोध आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत सिडकोने घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी दोन लाख घरे बांधली जाणार होती पण त्याची संख्या आता कमी करण्यात आली आहेत. खारघर, तळोजा, कळंबोली, वाशी, नवीन पनवेल येथे या घरांच्या कामांना सुरुवातदेखील झाली आहे. कामाचे स्थळ आणि राहण्याचे ठिकाण यातील अंतर कमी व्हावे यासाठी परिवहन आधारित घरांचा सिडकोने प्रस्ताव तयार केला असून व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांनी शुक्रवारी या स्थळांची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी सिडकोने १४ हजार ७३८ घरांची सोडत काढली होती. त्यानंतर ९ हजार २४९ घरांची सोडत गेल्या वर्षी काढण्यात आली. या घरांच्या बांधकामाची पाहणी करताना हे काम पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश डॉ. मुखर्जी यांनी दिले आहेत. या घरांचे हप्ते ग्राहकांनी भरले असून करोना काळातील विलंब आकार रद्द करण्यात आला आहे.

हे हप्ते भरण्यासाठी सिडकोने तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. या घरातील अध्र्या घरांचा ताबा ऑक्टोबरमध्ये दिला जाणार होता, पण मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बांधकामांना खीळ बसली होती. त्यात अनेक कंत्राटदारांचे कामगार मजूर हे गावी गेले होते.

ही कामे आता सुरू झाली असून मार्चपर्यंत ही घरे तयार होणार असल्याचा विश्वास डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मे पर्यंत या घरांचा ताबा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.