07 June 2020

News Flash

सिडकोच्या घरांसाठी दोन दिवसात  दहा हजार अर्ज

सिडकोने यंदा दोन लाख दहा हजार घरांची घोषणा केली आहे

संग्रहित छायाचित्र

सिडकोच्या ९५ हजार घरांच्या महागृहनिर्मितीपैकी ९ हजार २४९ पहिल्या टप्प्यातील घरांसाठी १० हजार ग्राहकांनी मागणी अर्ज केले असून यातील ३ हजार ८४२ ग्राहकांनी अनामत रक्कम भरलीदेखील आहे.

सिडकोच्या जुन्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या ८१३ घरांसाठी जास्त मागणी असून आतापर्यंत १६ हजार ५७१ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. त्यातील ७ हजार ७१३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीत सहभाग दाखविला आहे. त्यामुळे सिडकोच्या दहा हजार ६२ घरांसाठी नऊ दिवसांत एकूण २६ हजार ५७१ अर्ज आले आहेत.

सिडकोने यंदा दोन लाख दहा हजार घरांची घोषणा केली आहे.यातील ९ हजार २४९ घरांसाठी मंगळवारपासून नोंदणी सुरू झाली असून यासाठी दहा हजार ग्राहकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यातील ३ हजार ८४२ ग्राहकांनी अनामत रक्कम भरलेली आहे. पुढील महिन्यात या घरांची सोडत निघणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 1:02 am

Web Title: cidco house lottery akp 94
Next Stories
1 कांदा आणखी कडाडणार
2 मोकळ्या भूखंडावर गृहप्रकल्प
3 फेसबुकवर मैत्री करून फसवणूक
Just Now!
X