सिडकोच्या महागृहनिर्मितीतील नऊ  हजार आणि जुन्या स्वप्नपूर्ती गृह संकुलातील आठशे घरांची सोडत दिवाळीत २६ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या गृहयोजनेत अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दहा हजार नागरिकांचे ऐन दिवाळीत घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सिडकोने एकूण दोन लाख घरनिर्मितीची घोषणा केली आहे केंद्र सरकारच्या २०२२ पर्यंत सर्वासाठी घर या योजनेतील हा एक भाग आहे. त्यानुसार गेल्या वर्षी १४ हजार ७३८ घरांची सोडत आणि बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर यंदा सिडकोने ९५ हजार घरांची घोषणा केली असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील ९ हजार २४९ घरांची अर्ज नोंदणी सुरू करण्यात

आली आहे. त्याची मुदत १८ ऑक्टोबर होती. त्याऐवजी ती आता ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. सिडकोने जुन्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील शिल्लक ८१४ घरांची विक्रीसुद्धा सुरू केली आहे. त्यांची मुदत ५ ऑक्टोबर रोजी संपत होती त्याऐवजी ती ५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही योजनांचे अर्ज नोंदणी ५ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ आहे.