उरण : उरण तालुक्यातील उरण ते शेवा या मार्गावरील फुंडे येथील खाडीवर असलेला साकव बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कोसळला. या मार्गाने जेएनपीटी परिसरातून नोकरीवरून येणारा एक दुचाकीस्वार या साकवमध्ये कोसळून जखमी झाला होता. त्याचा जेएनपीटी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या साकवमुळे या परिसरात तीन गावांना वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.

जेएनपीटी बंदराला जाणाऱ्या उरण ते जेएनपीटी या मार्गावर फुंडे गावाजवळ एक खाडी असून ३२ वर्षांपूर्वी सिडकोकडून बांधण्यात आलेला होता. या साकवावरून हजारो वाहने दररोज प्रवास करीत होती. बुधवारी सायंकाळी हा साकव कोसळला. त्या वेळी रहदारी कमी असल्याने पुढील घटना टळली अन्यथा मोठा अपघात झाला असता. सिडकोकडून बांधण्यात आलेला हा साकव सळईचा कोणताही तुकडा न जोडता जोडला गेला होता. त्यामुळे साकव तुटल्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. ही घटना घडताच पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली आहे.

Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Over 3500 monthly passes for air-conditioned locales on a single day
गारेगार प्रवासाला पसंती! वातानुकूलित लोकलचे एकाच दिवशी ३,५०० हून अधिक मासिक पास