13 December 2017

News Flash

सिडकोची बेकायदा बांधकामांवर कारवाई

महानगरपालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्या मागे सिडकोचा भूखंड आहे.

प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: May 20, 2016 2:38 AM

नेरुळ येथील सारसोळे गाव सेक्टर -६ येथील सिडकोच्या भूखंडावर बेकायदा इमारतीचे बांधकाम सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केले.

महानगरपालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्या मागे सिडकोचा भूखंड आहे. या जागेवर चार मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावर नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या पथकांनी मिळून कारवाई केली. या वेळी आणखी दोन इमारतींच्या बांधकामांवरही कारवाई केली.  इमारतीवरील कारवाईस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या इमारतींना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अतिक्रमणविरोधी विभागाचे अधिकारी मनोहरम मेनन यांनी या वेळी दिली.

First Published on May 20, 2016 2:38 am

Web Title: cidco talking action on illegal construction