लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे स्वच्छ भारत अभियानात ‘लोकप्रतिसाद’ या निकषात नापास होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला या वर्षीही हा पेपर कठीण जाणार आहे. दिवाळीनंतर शहरात वाढलेले करोना रुग्ण यामुळे पालिकेची चिंता वाढली असून दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाचीही परीक्षा सुरू आहे.

केंद्र सरकारने देशात गेली सहा वर्षे स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. देशातील साडेचार हजारपेक्षा जास्त शहरे या अभियानात भाग घेत असून नवी मुंबई हे राज्यातील एकमेव स्वच्छ शहर म्हणून गेली पाच वर्षे बाजी मारत आहे. गेल्या वर्षीच्या परीक्षेत तर नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे पहिल्या क्रमांकाची अपेक्षा वाढली असून केवळ दोन ऑक्टोबरपासून नवी मुबंई पालिका प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. याच वेळी पालिकेचा उद्यान गैरव्यवहार आणि शहरातील साफसफाई कंत्राटांची समस्या निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे आव्हान पेलताना प्रशासनाला या दोन कामांवर निर्माण झालेला संशय दूर करण्याची कसरत पार पाडावी लागत आहे. स्वच्छ भारत अभियानाची प्रक्रिया सर्वसाधारण एप्रिल महिन्यात सुरू केली जात असल्याचे दिसून येते, मात्र यंदा करोनामुळे मार्चपासून टाळेबंदी जाहीर झाल्याने साफसफाई कामातही काही प्रमाणात शिथिलता आली आहे. एप्रिलपासून सुरू होणारे हे अभियान यंदा ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले असून पुढील वर्षांच्या प्रारंभी त्याची चाचणी सुरू होणार आहे. सार्वजनिक शौचालय, घनकचरा वर्गीकरण, क्षेपणभूमी व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, राडारोडा व्यवस्थापन, दैनंदिन साफसफाई अशा अनेक निकषांवर ही परीक्षा घेतली जात असून यासाठी केंद्रीय पथक अचानक शहरात भेट देते. या सर्व प्रकारात नवी मुबंई पालिका राज्यातील इतर पालिकांपेक्षा काकणभर सरस आहे, मात्र लोकप्रतिसाद या निकषात पालिकेला गेली दोन वर्षे विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. शहरातील सहा लाख नागरिकांची माहिती केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकाकडे आहे. यातील कोणत्याही नागरिकाला संपर्क करून या पथकातील अधिकारी शहराविषयी माहिती विचारत आहेत. तीनशे गुणांच्या या परीक्षेत यंदा शहरातील नागरिकांचे स्वच्छताविषयक जनरल नॉलेजदेखील तपासले जाणार आहे. तुमच्या विभागातील स्वच्छता कशी आहे. कचरा वर्गीकरण केला जातो का, याशिवाय गेल्या वर्षी तुमच्या शहराला कोणता क्रमांक मिळाला होता असे प्रश्न विचारले जाणार आहेत. शहराबद्दल फारशी आपुलकी नसलेले काही नागरिकही प्रष्टद्धr(२२४)नाला उडवून लावत असल्याचे दिसून येते. करोनाच्या वाढत्या संख्येमुळे एक निराशाजनक वातावरण असताना अशा प्रष्टद्धr(२२४)नांना यंदा उत्तर देण्यास नागरिक उत्सुक नसणार अशी भीती प्रशासनाला आहे. या निकषात दरवर्षी मागे पडणारे शहर यंदा या बदललेल्या प्रष्टद्धr(२२४)नांचा सामना करणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना या अभियानात फारसा रस नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे यंदा ग्रामीण भागासाठी वेगळ्या योजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव आणि पहिला क्रमांक येण्याची कसोटी या दोन चक्रव्यूहांत पालिका प्रशासन यंदा फसले आहे. त्यासाठी जनतेची साथ महत्त्वाची असल्याचे प्रशासनाचे आवाहन आहे.

करोनामुळे उशिरा सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाने आता वेग घेतला असून शहरातील मोक्याच्या जागांची रंगरंगोटी, जनजागृती, पथनाटय़ांना सुरुवात होणार आहे. ठिकठिकाणी स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या प्रतिकृती बनविल्या जात आहेत. या सर्व प्रक्रियेत जनतेचा प्रतिसाद फार महत्त्वाचा असल्याने केंद्रीय पथकाकडून विचारणा करण्यात येणाऱ्या प्रष्टद्धr(२२४)नांची माहिती नागरिकांनी द्यावी.
– डॉ. बाबासाहेब रांजळे, उपायुक्त, नवी मुंबई पालिका