नवी मुंबई पालिका-‘निसर्गप्रेमी’ संस्थेचा उपक्रम

नवी मुंबई महानगरपालिका आणि सानपाडा येथील ‘निसर्गप्रेमी फांऊडेशन’ यांच्या वतीने जुईनगर रेल्वे स्थानकाजवळील पडिक जमिनीवर वृक्षारोपण केले, अर्थात या रोपांच्या वाढीसाठी लागणारे खतही तयार करण्यात आले आहे.

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

प्रत्येक घरातील सुका आणि ओला कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रियेद्वारे खत तयार करण्यात येत आहे. यात निर्माल्याचा मोठा वाटा आहे.

गांडूळ शेती आणि त्यापासून जैविक खत आणि पालापाचोळ्यापासून नैसर्गिक कोळसा तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई पालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते नुकताच झाला.  गेली आठ वर्षे निसर्गप्रेमी संस्था रोप संवर्धन; तसेच पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवीत आहे. कचरा हा घातक न ठरवता तो उपयोगी ठरवण्याच्या पालिकेच्या आणि निसर्गप्रेमी संस्थेच्या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिला तर भविष्यात कचरा ही समस्या उरणार नाही, असा आशावाद महापौरांनी या वेळी व्यक्त केला.