News Flash

पनवेलमध्ये करोना मृत्यूंची चिंता कायम

१ एप्रिलपासून ३२६ जणांच्या मृत्यूची नोंद

१ एप्रिलपासून ३२६ जणांच्या मृत्यूची नोंद

पनवेल : दीड वर्षांच्या करोनाकाळात मंगळवारी पनवेलमध्ये एक हजार करोना मृत्यूंची नोंद झाली. या काळात दुसऱ्या लाटेत १ एप्रिलपासून फक्त ४२ दिवसांत ३२६ जणांचा मृत्यू झाला असून याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

मृतांची ही संख्या टाळता आली असती का, असा प्रश्न पनवेलकर विचारत असून पालिका प्रशासनाने हात झटकले आहेत. रुग्णांनी लक्षणे लपवून ठेवल्याने थेट जीवरक्षक प्रणालीची गरज निर्माण होण्याचे प्रकार या काळात वाढल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे उत्तर पालिका प्रशासनाने दिले आहे.

वाढत्या करोना मृत्यूंमुळे पनवेल पालिकेने खास वैद्यकीय पथक नेमले होते. या पथकाच्या अहवालबाबत मात्र अद्याप कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र अपुरे मनुष्यबळ, कमी पडलेली आरोग्य व्यवस्था ही करोनामृत्यूस कारणीभूत असल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात आतापर्यंत ५४३१६ जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी ५०,७१० रुग्ण बरे झाले, मात्र एक हजार जणांचा मृत्यू झाला. आजही २,६०६ रुग्ण विविध रुग्णालये व घरून उपचार घेत आहेत.  १ एप्रिलपासून फक्त ४२ दिवसांत ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे.   ही गंभीर  परिस्थिती असतानाही पनवेलमध्ये अजूनही अनेक नागरिक मुखपट्टी लावत नाहीत. विशेष म्हणजे पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे सर्व सुरू आहे, मात्र संबंधिताविरोधात कारवाई होऊ  शकत नाही. उलट सामान्य नागरिक व फेरीवाले, दुकानदार यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात आहे.

१३ ऑक्टोबर

करोना मृत्यू  : ५०१

एकूण रुग्ण  : २१७३६

करोनामुक्त  : १९६३३

उपचाराधीन रुग्ण : १६०२

करोना चाचण्या : ७६३५९

१८ नोव्हेंबर

करोना मृत्यू  : ५७०

एकूण रुग्ण  : २४५३८

करोनामुक्त : २३५५८

उपचाराधीन रुग्ण : ४१०

करोना चाचण्या : ९३३९८

१० जानेवारी

करोना मृत्यू  : ६१२

एकूण रुग्ण  : २८००६

करोनामुक्त : २६९३८

उपचाराधीन रुग्ण : ४५६

करोना चाचण्या : ११७९६१

२२ फेब्रुवारी

करोना मृत्यू  : ६३९

एकूण रुग्ण  : २९६५३

करोनामुक्त : २८५५९

उपचाराधीन रुग्ण : ४५५

करोना चाचण्या : १,३८,७८८

१ मार्च

करोना मृत्यू  : ६४४

एकूण रुग्ण  : ३००९८

करोनामुक्त : २८९१४

उपचाराधीन रुग्ण : ५४०

करोना चाचण्या : १,४३,६८६

८ एप्रिल

करोना मृत्यू  : ६९०

एकूण रुग्ण  : ३९४२३

करोनामुक्त : ३५०३८

उपचाराधीन रुग्ण : ३६५९

करोना चाचण्या :१८१३४४

करोनास्थिती

करोना मृत्यू  : १००

एकूण रुग्ण  : ५४३१७

करोनामुक्त  :  ५०७१०

उपचाराधीन रुग्ण : २,६०७

करोना चाचण्या : २६०६७९

वयोगटानुसार मृत्यू

१ ते १०  : ००

१० ते २० : ०४

२० ते ६०  :  ४०४

६० च्या पुढे  : ५९२

एकूण  : १०००

पनवेल पालिका करोना मृत्यूंबाबत गंभीर आहे. पालिका आयमुक्त सुधाकर देशमुख यांनी बुधवारीच सर्व बालरोगतज्ज्ञांशी ऑनलाइन बैठक घेऊन पुढील नियोजनाचे आदेश दिले आहेत.  कमीत कमी मृत्यू व्हावेत यासाठीच वैद्यकीय यंत्रणा झटत आहे. रुग्णांनी लक्षणे आल्यावर तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, हेच गरजेचे आहे.

– संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:13 am

Web Title: concerns over corona deaths persist in panvel zws 70
Next Stories
1 हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात
2 करोना संसर्ग आटोक्यात
3 करोनारुग्णांना सेवा देतोय, याचा अभिमान!
Just Now!
X