News Flash

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने महिलांचे महिन्याचे बजेट पार कोलमडले आहे. डाळी, धान्य, कडधान्ये, तेल, साखर या रोजच्या वापरातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने महिला

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने महिलांचे महिन्याचे बजेट पार कोलमडले आहे. डाळी, धान्य, कडधान्ये, तेल, साखर या रोजच्या वापरातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण आहे.
या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. कोपरखरणे सेक्टर १५ व १६ येथील भाजी मार्केट परिसरात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान नागरिकांना महागाईबाबत माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. यावेळी एक चौकसभाही घेण्यात आली, तसेच काही कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात पथनाटय़ही सादर केले. केंद्र व राज्य सरकार महागाई रोखण्यात साफ अपयशी पडल्याची टीका यावेळी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 7:46 am

Web Title: congress protest against navi mumbai
Next Stories
1 दिघ्यामधील अनधिकृत झोपडय़ांचा भाव वधारला!
2 अवकाळी हापूस बाजारात
3 क्षेत्रसभांचे स्वरूप पंधरा दिवसांत ठरणार
Just Now!
X