14 July 2020

News Flash

कंत्राटी कामगारांच्या बंदमुळे जेएनपीटी व्यवस्थापन नरमले

असे आश्वासन अध्यक्षांकडून देण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव जनार्दन बंडा यांनी दिली.

जेएनपीटी बंदरातील कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराचा मसुदा तयार करावा, तसेच प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी कामगारांनी मंगळवारी लाक्षणिक बंद पुकारला होता.

जेएनपीटी बंदरातील कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराचा मसुदा तयार करावा, तसेच प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी कामगारांनी मंगळवारी लाक्षणिक बंद पुकारला होता. याची दखल घेत जेएनपीटीच्या अध्यक्षांनी तातडीने मुंबई येथे जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून ९ डिसेंबरला नवीन वेतनवाढीचा मसुदा सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.
सोमवारी केंद्रीय कामगार आयुक्तांच्या मुंबई येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत जेएनपीटी व्यवस्थापनाकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने संतप्त झालेल्या कंत्राटी कामगारांनी जेएनपीटी काम बंद करून जेएनपीटी प्रशासनावर मोर्चा नेला होता. याची दखल घेत जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मध्यस्थीने चर्चा केली.
या वेळी जेएनपीटी व्यवस्थापनाकडून कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढ व सुविधासंदर्भात मसुदा तयार करण्यात येऊन सादर करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षांकडून देण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव जनार्दन बंडा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2015 2:43 am

Web Title: contract workers demanded salary growth
Next Stories
1 उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तळोजातील पाणीसंकट कायम
2 सिडकोची अनधिकृत इमारतीवरील कारवाई कायम
3 स्वतंत्र जिने नसल्याने अपंग प्रवाशांचे हाल
Just Now!
X