News Flash

करोनाबाधित ३२५ गर्भवतींची प्रसूती

करोनाकाळात महिलांची प्रसूती ही गंभीर बाब बनली होती.

संग्रहीत

 

|| पूनम सकपाळ

बालकेही सुखरूप; पालिकेच्या बेलापूर रुग्णालयात विशेष कक्ष

नवी मुंबई : नवी मुंबईतील पालिका व खासगी रुग्णालयांत फेब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाबाधित ३२५ गर्भवतींची यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. पालिका रुग्णालयात झालेल्या प्रसूतींत बालकांना करोनाचा संसर्ग झाला नसून ती  सुखरूप असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

करोनाकाळात महिलांची प्रसूती ही गंभीर बाब बनली होती. त्यात बाधित झालेल्या महिलेची प्रसूती हे रुग्णालयांपुढील मोठे आवाहन होते. नवी मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये करोना संसर्ग पसरू लागल्यानंतर पहिली करोनाबाधित गरोदर महिलाही मार्च २०२० मध्ये आढळली होती. तिची प्रसूती ही डॉक्टरांपुढे आव्हान होते. याआधी महापालिकेच्या वाशी रुग्णालयात करोनाबाधित गरोदर मातांची प्रसूती करण्यात येत होती. मात्र त्यानंतर बेलापूर येथील माता बाल रुग्णालयात यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता. गेल्या वर्षी मार्च २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयांत एकूण ३२५ करोनाबाधित असलेल्या गरोदर महिलांची यशस्वी प्रसूती झाली असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धनवंती घाडगे यांनी  दिली आहे. यातील महापालिका रुग्णालयात प्रसूत झालेल्या बालकांपैकी कोणालाही करोनाची लागण झाली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ही सर्व बालकेही सुखरूप आहेत.

या काळात गरोदर महिलांची प्रसूती हे आव्हानात्मक होते. त्यामुळे काही वेळा शस्त्रक्रिया तर काही वेळा नैसर्गिक प्रसूती झाल्या आहेत. मात्र या बालकांना त्यांच्या मातांपासून दूर ठेवत सांभाळ करण्याचे मोठे आवाहन पेलण्यात शहरातील रुग्णालय यशस्वी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 4:35 pm

Web Title: corona infected belapur hospital akp 94
Next Stories
1 वाढत्या रुग्णसंख्येनंतरही बेफिकीरी
2 बनावट सह्य करून घर लाटल्याप्रकरणी एकाला अटक
3 करोना चाचणीनंतर मॉलमध्ये प्रवेश
Just Now!
X