18 September 2020

News Flash

करोनामुक्तीचा दर ७४ टक्क्यांवर

एका दिवसात सर्वाधिक १११३ करोनामुक्त

एका दिवसात सर्वाधिक १११३ करोनामुक्त

नवी मुंबई : शहरात करोना बाधितांचा आकडा १७ हजाराच्या  पार झाला आहे. याच वेळी शहरात दिलासादायक गोष्ट म्हणजे रुग्ण बरे होण्याच्या दरातही जवळजवळ १८ टक्कय़ांनी वाढ झाली आहे.शहरातील आरोग्यव्यवस्था अधिक मजबूत करुन सर्वांच्या मदतीने व नागरीकांच्या सहकार्याने शहर करोनामुक्तीचे लक्ष गाठण्यासाठी पालिका प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना बुधवारी करोनाकाळातील एका दिवसात सर्वाधिक १११३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शहरातील करोनामुक्तीचा दरही ५६ वरुन ७४ टक्क्यांपर्यंत झाला आहे. त्यामुळे शहरासाठी ही दिलासादायक बाब असून शहराचे करोनामुक्तीच्या दिशेने सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

आगामी काळात करोनामुक्तीच्या दरात  अधिक सुधारणा पाहायला मिळेल असा निर्धार पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबईत  मोठय़ा प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढली असल्याने दुसरीकडे करोनाचे रूग्णही अधिक सापडत आहेत. त्यामुळे २५० ते ४००च्या आत रुग्ण सापडत असून बांगर यांनी शहरात जास्त चाचण्या अधिक करुन रुग्ण वाढले तरी चालेल पण लवकर निदान करुन तात्काळ उपचार करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तात्काळ चाचणी केल्यामुळे लवकर निदान होऊन लगेच उपचार सुरू झाल्याने करोनामुक्तीची संख्याही वाढू लागली आहे.  करोनाला रोखण्यासाठी पालिका सर्वोतोपरी प्रय करत आहे.करोना मृत्यूदर कमी करण्यासाठीही प्रत्येक करोनामृत्यूबाबतही अतिशय गांभीर्याने घेतले जात आहे.

करोनामुळे मृत झालेल्यांमध्ये  ५० वयोगटावरील  रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरीकांची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालिकेने केले आहे. नवी मुंबई शहरात करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या १७ हजाराच्या पुढे गेली असून शहरात ४५०च्या जवळपास करोनामुळे मृत्यू झालेले आहेत. मुंबई शहरातही करोनामुक्तीचा दर चांगला असून नवी मुंबईत करोनातून बरे झालेल्यांची संख्याही झपाटय़ाने वाढत असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या १२ हजार ५०० पर्यंत पोहचली आहे.

आयुक्तांनी संपूर्ण आरोग्ययंत्रणेचे सुकाणू आपल्या नियंत्रणात घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांच्या मदतीने झटपट निर्णय घेतले जात असल्याने पालिकेची स्वतंत्र प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.

५ ऑगस्ट रोजी करोनास्थिती

* एकूण करोनाबाधित रुग्ण                                          १६९५७

* करोनामुक्त रुग्ण                                                     १२४७४

* करोनामुक्तीचा दर                                                    ७४ टक्के

* एका दिवसातील सर्वाधिक करोनामुक्त व्यक्ति          १११३

शहरातील करोनामुक्तीचा दर हा वाढला आहे. हे समाधानकारक आहे. चाचण्या वाढवल्यामुळे दररोजच्या सकारात्मक रुग्णांमध्ये वाढ दिसत असले तरी करोनामुक्तीसाठी अधिकाधिक चाचण्या हेच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरातील करोनामुक्तीचा दर हा ७४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:32 am

Web Title: corona recovery rate at 74 percent in navi mumbai zws 70
Next Stories
1 करोनेतर रुग्ण उपचाराविना!
2 शीव-पनवेल महामार्गावर खड्डे
3 अवघ्या १२ तासांत पुन्हा ‘मॉल बंद’चे आदेश
Just Now!
X