आज फक्त पालिकेच्या तीन रुग्णालयांत कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेला बुधवारी मिळालेल्या दहा हजार लस कुप्यांपैकी गुरुवारी एक दिवसातच ८८७६ कुप्या संपल्या असल्याने शहरात पुन्हा लस तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी पालिकेच्या तीन रुग्णालयांत फक्त कॉव्हॅक्सिनची दुसरी मात्रा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी शहरातील ९० केंद्रांवर महापालिकेने लसीकरण केले. तिसऱ्या लाटेच्या भीतीने नागरिकांना लस हवी आहे. पण शासनाकडून सातत्याने कमी लस मिळत असल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. मागील आठवडय़ात २९ जुलैनंतर बुधवारी दोन्ही लशींच्या दहा हजारा मात्रा मिळाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी महापालिकेने दोन्ही मात्रांचे ९० केंद्रांवर लसीकरण केले, असे महापालिकेच्या लसीकरणप्रमुख रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.

गुरुवारचे लसीकरण

कोविशिल्ड : ४९४०

कोव्हॅक्सीन : ३९३६