News Flash

अंडे दोन रुपयांनी महाग; ७८ रुपये डझन

प्रतिकारशक्ती वाढत असल्याने करोना रुग्णांबरोबर नागरिकांनी दररोज अंडे खावे असा सल्ला डॉक्टर देत असल्याने अंडय़ांना मागणी वाढली आहे.

नवी मुंबई : प्रतिकारशक्ती वाढत असल्याने करोना रुग्णांबरोबर नागरिकांनी दररोज अंडे खावे असा सल्ला डॉक्टर देत असल्याने अंडय़ांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अंडय़ांचे दरही वाढले असून ५ रुपयांना मिळणारे एक अंडे आता ७ रुपयांना मिळत आहे. तर डझनचे दर ७८ रुपये झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. तेलाचे दर प्रचंड वाढले असून डाळीही महाग झाल्या आहेत. दररोज लागणारी भाजीही आता परवडत नाही. त्यात अलीकडे न्याहारीसह आहारात अंडय़ाचा वापर वाढला आहे. करोनानंतर अंडय़ांची मागणी प्रचंड वाढली आहे. करोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात चिकन खाल्याने संसर्ग होऊ शकतो अशी अफवा पसरली होती. त्यामुळे चिकन व अंडय़ांची मागणी घटली होती. मात्र अंडे खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा सल्ला आता डॉक्टर देत असल्याने अंडय़ांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आता ५ रुपयांना मिळणारे अंडे ७ रुपये झाले आहे.

पोल्ट्री फार्ममधूनच दर वाढविले आहेत अशी महिती अंडे विक्रेत्यांनी दिली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत अंडय़ाचे दर ४८ रुपये डझन होते. त्यानंतर त्यात वाढ होत ७२ रुपये इतके दर झाले होते. आता ७८ रुपये डझन अंडय़ाचे दर झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून अंडय़ाचे दर वाढले आहेत. पोल्ट्रीमधूनच वाढीव दराने अंडी मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातसुद्धा दर वधारले आहेत.

– विक्रम जैस्वाल, विक्रेता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:35 am

Web Title: corona virus eggs hike rates immunity covid panvel ssh 93
Next Stories
1 जनजीवन विस्कळीत
2 जबाबदारी की बेफिकिरी.. नागरिकांनी ठरवावे!
3 लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण
Just Now!
X