News Flash

करोनावर १०४ कोटींचा खर्च

नवी मुंबई महापालिकेची करोनापूर्वी आरोग्य सुविधा ही तोकडी होती. इमारतींची पालिकेने उभारणी केली होती,

(संग्रहित छायाचित्र)

शासनाकडून अद्यापपर्यंत १० कोटींचे अनुदान

नवी मुंबई : मार्चनंतर शहरात करोना संसर्ग वाढल्यानंतर आतापर्यंत महापालिका प्रशासनाने आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सुमारे १०४ कोटींचा खर्च केला आहे. आता पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने या खर्चात वाढ होणार आहे. शासनाने मात्र अनुदानापोटी २९६ कोटींचा शासनाकडे प्रस्ताव पाठवला असताना फक्त १० कोटींचा निधी पालिकेला मिळाला आहे.

नवी मुंबई महापालिकेची करोनापूर्वी आरोग्य सुविधा ही तोकडी होती. इमारतींची पालिकेने उभारणी केली होती, मात्र वैद्यकीय यंत्रणा व मनुष्यबळ पुरेसे नव्हते. त्यात मार्चपासून शहरात करोना संसर्ग पसरला. तो हळूहळू वाढू लागल्यानंतर पालिका प्रशासनाची आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली. त्यामुळे पालिका प्रशासनाला आरोग्यव्यवस्थेत वाढ करण्याबरोबर मनुष्यबळाची मोठी भरती करावी लागली. यात पालिकेने २० दिवसांत सिडको प्रदर्शनी केंद्रात

११८३ खाटांचे रुग्णालय उभारले. नेरुळे येथे स्वतंत्र प्रयोगशाळा उभारली, तर शहरात विविध ठिकाणी प्राणवायू, अतिदक्षता खाटांची व्यवस्था केली. रुग्णांसाठी जेवणासह मनुष्यबळाचा वाढलेला खर्च याचा मेळ घालण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली.

त्यात गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पुरेसा निधीही आरोग्यासाठी ठेवण्यात आला नव्हता, त्यामुळे खर्चाचे गणित बसवत आरोग्य सुविधांत मोठी वाढ पालिका प्रशासनाला करावी लागली. यासाठी आतापर्यंत करोनावर १०४ कोटींचा खर्च आला आहे.

पालिका प्रशासनाने

शासनाकडे अनुदानापोटी २९६ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे, मात्र त्यापैकी आतापर्यंत फक्त १० कोटींचा निधीच प्राप्त झाला आहे.  आता शहरात करोना रुग्णवाढ होत असलेल्याने बंद केलेली आरोग्य सुविधा व मनुष्यबळ भरती करावे लागणार आहे. चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे हे लक्ष्य असून रुग्णांची वाढती संख्या पाहता खर्चात वाढ होणार आहे, परंतु योग्य व आवश्यक ठिकाणीच खर्च करण्यात येत आहे. आतापर्यंत

१०४ कोटी खर्च झाले आहेत. शासनाकडून पालिकेला १० कोटी प्राप्त झाले आहेत. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:02 am

Web Title: corona virus infection 104 crore expenses akp 94
Next Stories
1 ‘कॉर्पोरेट पार्क’मध्ये ‘रग्बी’ खेळविणार
2 मतदारांच्या नावात फेरफारासाठी आर्थिक व्यवहार
3 रिक्षा वाहतुकीत बेपर्वाई
Just Now!
X