News Flash

रुग्णदुपटीचा धोका!

पंधरा, सोळा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे.

संग्रहीत

७३५ दिवसांवरून दुपटीचा काळ ५० दिवसांवर

नवी मुंबई :  करोना रुग्णवाढीमुळे नवी मुंबईतील रुग्णदुपट्टीचा ७३५ दिवसांवर गेलेला काळ आता फक्त ५० दिवसांवर येऊन ठेपला आहे. दैनंदिन करोना रुग्णांची संख्या दीड हजारापर्यंत गेल्याने ही परिस्थिती बिघडली आहे. यामुळे शहराचा धोका अधिक वाढला आहे.

या सर्व परिस्थितीमुळे शहरातील सध्याची आरोग्य व्यवस्था अपुरी पडण्याची भीती असून पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. अतिदक्षता खाटांची संख्या दुपटीने वाढवण्याचे लक्ष पालिकेने ठेवले असले तरी तीही अपुरी पडण्याची भीती आहे.

पंधरा, सोळा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजी ४७७ सर्वाधिक रुग्ण सापडले होते. त्यानंतर ही संख्या कमी झाली होती. त्यामुळे शहराला दिलासा मिळाला होता. मात्र आता दररोज नवे उच्चांक करोना गाठत आहे. गुरुवारी ९७१ पर्यंत गेलेली दैंनदिन करोना रुग्णसंख्या शनिवारी १२०५ पर्यंत गेली तर त्यात वाढ होत रविवारी ही संख्या १४४१ पर्यंत वाढली. सोमवारी यात आणखी वाढ होत ही संख्या…पर्यंत गेली आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच हादरले आहे.

रुग्णवाढीचा हा आकडा दोन हजारापेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याने खाटांचा तुटवडा निर्माण होणार आहे, ही गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.  प्राणवायू खाटांची संख्या पालिकेकडे सध्या तरी पुरेसी असली तरी साध्या व अतिदक्षता खाटांसाठी मात्र आताच नागरिकांची फरफट सुरू झाली आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी साध्या व अतिदक्षता खाटांची संख्या वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

नवी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी हा २ वर्षांपेक्षा अधिक झाला होता.तो आता फक्त ५० दवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांनी अतिशय खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती होणार असल्याचे भीतीही व्यक्त होत आहे.

रुग्णांसाठी मदतकक्ष

नवी मुंबई : करोना रुग्णविस्फोट होत असल्याने शहरात रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने खाटा व रुग्णवाहिका उपलब्ध

व्हाव्यात याकरिता महापालिका मुख्यालयात मदतकक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष दिवसरात्र सुरू राहणार आहे.

नागरिकांनी ०२२-२७५६७४६० या क्रमांकावर संपर्क साधल्यास रुग्णाच्या लक्षणांची तीव्रता जाणून घेऊन त्यांना योग्य आरोग्य  सुविधा उपलब्ध होईपर्यंत पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णवाहिका उपलब्धतेसाठीही मदत केली जाणार आहे. याशिवाय रक्तद्रवविषयक माहिती व जनजागृती केली जाणार आहे.

११३५ नवे बाधित

नवी मुंबईत सोमवारी ११३५  नवे करोनाबाधित आढळले  तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची संख्या  ७१,२३८  इतकी झाली आहे. तरा्र  मृत्यू  झालेल्यांची संख्या ११९१  झाली आहे .

शहरात नवे रुग्णसंख्या ३ अंकावरून ४ अंकावर पोहचली आहे. त्यामुळे शहरात नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दुसरीकडे रुग्णदुपटीचा कालावधी ७३५च्या पुढे गेला होता तो फक्त ५० दिवसांच्या जवळपास आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. करोनाचे वाहक बनू नका व नियमावलींचे पालन करा. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:00 am

Web Title: corona virus paitent in double of the patient akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चार हजारांपेक्षा अधिक प्रतिबंधित क्षेत्रे
2 सिडको घरांचा ताबा मे नंतर
3 मालमत्ता करातून ५४० कोटी
Just Now!
X