25 February 2021

News Flash

‘ते’ आता हात जोडतात…

नवी मुंबईतील कोपरी गाव हे या तृतीय पंथीयांचे आश्रयस्थान आहे.

 

तृतीय पंथीयांकडून ‘पोस्त’ मागण्याच्या पद्धतीत बदल

नवी मुंबई : करोनानंतर अनेकांच्या जीवन व व्यवसाय शैलीत फरक पडल्याचे दिसून येत आहे. गेले दहा महिने घरातच बसलेले तृतीय पंथीदेखील याला अपवाद नाहीत. या अगोदर टाळ्या अथवा वाहनांची काच वाजवून पोस्त मागणाऱ्या तृतीय पंथीयांनीही यात बदल करीत आता दोन हात जोडून नमस्कार करतच पैसे मागण्याची नवीन शैली आत्मसात केली आहे.

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील सहा गर्दीचे मोठे सिग्नल, एपीएमसीचे वाणिज्य क्षेत्र, आणि आता टोलनाके अशा गर्दीच्या ठिकाणी तृतीय पंथी हक्काने पैसे मागत असल्याचे चित्र दिसून येते. दिवसभराच्या या कमाईतून शे-पाचशे रुपये त्यांच्या हातात पडतात. त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. वाहनांची बंद असलेली तावदाने खाली करण्यासाठी त्यांच्यावरील चलनी नाणे हातात घेऊन केलेली टकटक अनेकांच्या डोक्यात जाणारी असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे वाहनचालक, मालक आणि तृतीय पंथीयांचे खटके उडत असल्याचे दृश्य अनेक वेळा पाहण्यास मिळते. करोना काळात रस्त्यावर वाहतूक आणि वाणिज्य संकुले बंद असल्याने तृतीय पंथीयांना घरात राहण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. त्यात अनेकांची उपासमार झाल्याची चर्चा आहे. बहुतांशी तृतीय पंथी हे सिगारेट, दारु आणि अंमली पदार्थाचे व्यसनाधीन असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दिवसभर नशेत राहून तृतीय पंथीयांनी दहा महिने कसेबसे काढलेले आहेत.

नवी मुंबईतील कोपरी गाव हे या तृतीय पंथीयांचे आश्रयस्थान आहे. या ठिकाणी तृतीय पंथीयांची मोठी वसाहत असून त्यांनी नवी मुंबई आणि मुंबईची विभागणी करुन घेतलेली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील तृतीय पंथी एकमेकांच्या क्षेत्रात घुसखोरी करीत नाहीत. नवी मुंबईतील प्रमुख सिग्नल, एपीएमसीची सर्वात मोठी बाजारपेठ आणि वाशी, पनवेल (शेडुंग) येथील टोलनाके हे या तृतीय पंथीयांच्या कमाईची हक्काची ठिकाणे आहेत. करोनानंतर त्यांची जीवन शैलीत बदल झाला असल्याचे दिसून येते. तोंडावर मास्क, गळयात पैसे ठेवण्यासाठी एक लटकवलेली पिशवी, रंगीबेरंगी साडी, नकली दागिन्यांचा शृंगार, केसाचा टोकदार आंबाडा अशा आर्कषित रुपात हे तृतीय पंथी दिसू लागले आहेत. जोरजोरात टाळ्या ठोकून पैसे उकळण्यापेक्षा अतिशय नम्रपणे नमस्कार करून पैशांची मागणी करणारे तृतीय पंथी पनवेल येथील टोल नाक्यावर दिसून आले. ‘ओ जमाना गया साब, अभी प्यार से मागेंगे तो पैसा मिलता है’ अशी प्रतिक्रिया पिंकी नावाच्या तृतीय पंथीयाने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:55 am

Web Title: corona virus third gender differences in life and business style akp 94
Next Stories
1 बनावट कागदपत्रांच्या अधारे ५२ लाखांचे गृहकर्ज
2 मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीत दिरंगाई
3 नवी मुंबईतही निरुत्साह
Just Now!
X