आतापर्यंत ५१ हजार नागरिकांना ‘कोव्हिशिल्ड’ची लस
नवी मुंबई : लशीची पहिली मात्रा घेणाऱ्यांसाठी नवी मुंबईत खासगी केंद्रांवर मंगळवारपासून तर पालिका केंद्रांवर बुधवारपासून ‘कोव्हॅक्सिन’चा वापर करण्याच्या सूचना पालिक आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जाणार आहे. याबाबत पालिका आयुक्तांना विचारणा केल्यानंतर आमच्याकडे दोन्ही लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, मात्र शासनाच्या सूचनांनुसार हा बदल करण्यात येत असल्याचे सांगितले.
लसीकरणाच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील ५१ हजार ४२४ जणांना करोना लस देण्यात आली असून १ लाख ८० हजार जणांना लस देण्यात येणार आहे, तर दर दिवशी ५ हजार जणांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सध्या नवी मुंबई पालिकेच्या व खासगी अशा ३७ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. पुढील काळात ही केंद्रांची संख्या ५० पर्यंत करण्यात येणार आहे. तर तुर्भे येथील निर्यातभवन येथे जम्बो लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. सध्या पालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तीन सार्वजनिक रुग्णालये, तुर्भे येथील माता बाल रुग्णालय तसेच १८ नागरी आरोग्य केंद्रे अशा २२ केंद्रांवर मोफत लस दली जात आहे. पालिकेच्या तीन रुग्णालयांत २४ तास सेवा दिली जात आहे. तर १५ खासगी रुग्णालयांमध्येही २५० रुपये आकारून लसीकरण करण्यात आहे. आतापर्यंत ५१ हजार ४२४ जणांना करोना लस देण्यात आली आहे. १ लाख ८० हजार जणांना लस देण्यात येणार आहे.
आतापर्यंत नवी मुंबईत ‘कोव्हिशिल्ड’लशीचा वापर करण्यात येत होता. ज्यांना आतापर्यंत ‘कोव्हिशिल्ड’लशीचा पहिली मात्रा देण्यात आली आहे त्यांना दुसरी मात्राही त्याच लशीची देण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून खासगी रुग्णालयांत व बुधवारपासून पालिका केंद्रांवर पहिली लशीची मात्रा घेणाऱ्यांना ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जाणार आहे.
‘कोव्हिशिल्ड’
- उपलब्ध कुप्या : ७७५००
- कुप्यांचा वापर : ६२९८०
- शिल्लक कुप्या : १४५२०
‘कोव्हॅक्सिन’
- उपलब्ध कुप्या : १०२४०
- कुप्यांचा वापर : २५००
- शिल्लक कुप्या : ७७४०
आतापर्यंत ‘कोव्हिशिल्ड’ लस दिली जात होती. आता पहिली मात्रा घेणाऱ्यांना ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जाणार आहे. प्रत्येक लाभाथ््र्यांना दोन मात्रा घेणे अनिवार्य आहे. पहिली मात्रा ज्या लशीची घेतली त्यांनी दुसरी मात्राही त्याच लशीची घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. शहरात दोन्ही लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 12:07 am