News Flash

सात खासगी केंद्रांवर आजपासून लसीकरण

१ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे, मात्र नवी मुंबई फक्त पालिकेच्या तीन केंद्रांवरच ते सुरू आहेत.

संग्रहीत

तिसऱ्या दिवशीही तीनच केंद्रांवर सुविधा

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे, मात्र नवी मुंबई फक्त पालिकेच्या तीन केंद्रांवरच ते सुरू आहेत. खासगी रुग्णालयात तिसऱ्या दिवशीही लसीकरण झाले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय झाली. मात्र गुरुवारपासून अकरापैकी सात खासागी केंद्रांवर लहसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर बुधवारी २६४ जणांना लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंत ५२८ जणांना लस देण्यात आली आहे.

ऑनलाइन अ‍ॅपवर नोंदणी करण्यात आलेल्यांनाच लस देण्यात येणार असून नोंदणी न केलेल्योनी लसीकरणास न येण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मंगळवारी पालिकेने खासगी ११ रुग्णालयातील आरोग्यकर्मींना प्रशिक्षण दिले होते.परंतू त्यातील बुधवारी सात रुग्णालयांनी लशींचे पैसे शासनाकडे भरले आहेत. चाररुग्णालयांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली  नाही. त्यामुळे गुरुवारपासून या सहा रुग्णालयांत लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत लसीकरणाच्या पहिल्या दिवशीच शहरात गोंधळ उडाला होता. पालिकेने नियोजन न केल्याने खासागी रुग्णालयांत लसीकरण केंद्र सुरू झाली नाहीत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती राहिल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी पालिकेच्या केंद्रांवर जात विचारणा केली व होणाऱ्या विलंबाबत नाराजी व्यक्त केली. लसीकरणासाठी खासगी रुग्णालयाची पोर्टलवर कोल्ड चेन पॉइंट निर्माण होणे आवश्यक होते. त्यामुळे खासगी रुग्णालयातील लसीकरणासाठी तीन दिवस विलंब झाला आहे.

महापालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली या तीन रुग्णालयात ऑनलाइन तसेच ‘वॉक इन’ पध्दतीने लसीकरण सुरू आहे. परंतू गुरुवारपासून सात रुग्णालयात फक्त ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच लसीकरण करण्यात येणार आहे .  शहरात जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

या ठिकाणी  लसीकरण

डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय, नेरुळ

डिव्हाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

मंगलप्रभू नर्सिग होम,जुईनगर

आचार्य श्रीज्ञानेश हॉस्पिटल, नेरुळ

डॉ.आर.एन.सुरज हॉस्पिटल, सानपाडा

एमपीसीटी हॉस्पिटल, सानपाडा

सुयश हॉस्पिटल, सीवूड्स

पनवेलमध्य ८१६ जणांचे लसीकरण

पनवेल : पनवेलमधील पाच लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण करण्यात येत असून बुधवारी ८१६ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. लसीकरणानंतर आरोग्याची कोणतीही समस्या ज्येष्ठ नागरिकांना आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बुधवारी खारघर येथील टाटा रुग्णालयात मोफत ३७८ जणांचे लसीकरण करण्यात आले. तर उन्नती रुग्णालय व वाय.एम.टी. येरला रुग्णालयात प्रत्येकी १७९ जणांनी लस घेतली.

पनवेल रुग्णालयात ३५ तर तळोजा येथील श्री साई मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात ४५ जणांनी लस घेतली. बुधवारपासून पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात लसीकरणाची

ज्येष्ठ नागरिकांना सुरुवात केली, मात्र सायंकाळपर्यंत येथे किती जणांना लस दिली त्याची संख्या आरोग्य विभागाला प्राप्त होऊ  शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 12:43 am

Web Title: coronacirus vaccination starts from today in seven private hospitals dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालिका शहरात ३६ विद्युत चार्जिग केंद्रे उभारणार
2 केंद्रीय स्वच्छता पथकाच्या आता अचानक भेटी
3 दुबार मतदार नोंदणीमुळे मतदार यादीतील घोळ
Just Now!
X